एका माळेचे नऊ, नऊचे नऊ लाख होऊन मराठा आंदोलनाला बळकटी येईल - The Maratha movement will be strengthened by one gardener's nine, nine to nine lakhs | Politics Marathi News - Sarkarnama

एका माळेचे नऊ, नऊचे नऊ लाख होऊन मराठा आंदोलनाला बळकटी येईल

शांताराम काळे
शनिवार, 17 ऑक्टोबर 2020

एक मराठा लाख मराठा, छत्रपती शिवाजी महाराज की जय व छ्त्रपतीशिवाजी महाराजांना अभिवादन करून कार्यक्रमाला सुरुवात झाली.

अकोले : आंदोलन केल्यामुळेच सारथीला स्वायता मिळाली. तालुक्यात आज अभूतपूर्व असा मोर्चा निघाला. त्यामुळे आज शुभ दिवसाने सुरुवात झाली आहे. एका माळीचे नऊ व नऊचे नऊलाख होतील व या आंदोलनाला बळकटी येईल, माझा या सर्व कामाला जाहीर पाठिंबा असल्याचे माजी मंत्री मधुकर पिचड यांनी सांगितले.

एक मराठा लाख मराठा, छत्रपती शिवाजी महाराज की जय व छ्त्रपतीशिवाजी महाराजांना अभिवादन करून कार्यक्रमाला सुरुवात झाली. कार्यक्रमाचे अध्यक्ष सीताराम गायकर होते. रेश्मा गोडसे, अश्विनी काळे, अनिल झोलेकर, मराठा क्रांतीचे सुरेश नवले, मारुती मेंगाळ, दीपक महाराज देशमुख, बी. जे. देशमुख, निवृत्ती महाराज देशमुख, मधुकर नवले,शिवाजी धुमाळ, अशोक भांगरे, भाजपचे तालुका अध्यक्ष सीताराम भांगरे, काँग्रेसचे बाळासाहेब नाईकवाडी, शिवसेनेचे महेश नवले, मच्छिंद्र धुमाळ आदी या वेळी उपस्थित होते.

पिचड म्हणाले, की मराठा, मुस्लिम आरक्षण मिळावे, यासाठी राणे समितीमध्ये काम करण्याचे भाग्य मिळाले, मात्र न्यायलयाने आरक्षण फेटाळल्याने दुःख झाले. मात्र यापुढे संभाजीराजे यांचे हाकेला ओ देऊन लाल महाल ते लाल किल्ला असे आंदोलन करून आरक्षण मिळवू, त्यासाठी सर्वांनी जागृत राहावे. एकमेकात भांडणे लावण्याचा प्रयत्न होईल, त्यामुळे सर्वांना सोबत घेऊन हा प्रश्न निकाली काढल्याशिवाय आंदोलन थांबणार नाही, असे उद्गार माजी मंत्री मधुकर पिचड यांनी काढले.

शिवाजी धुमाळ यांनी झारीतील शुक्राचार्य हे मराठा समाजाचे मंत्री खासदार आमदार आहेत, त्यांच्यावर दबाव आणला पाहिजे. प्रकाश आंबेडकर व सदावर्ते यांचा या सभेत निषेध व्यक्त करतो, असे सांगितले. मराठा समाजाचे राज्य समन्वयक संभाजी दहातोंडे यांनी या घटनेचा साक्षीदार आहे. वसंत दादांनी मराठा समाजाला न्याय दिला, असे सांगितले.

दरम्यान, इंदोरीकर महाराज जनतेत बसले व भाषण न करताच निघून गेले. आपण पाठिंबा देण्यासाठी आलो असल्याचे त्यांनी सांगितले.

Edited By - Murlidhar Karale

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख