मराठा कार्यकर्ते कडाडले ! मंत्र्यांच्या घरावर धडकले - Maratha activists killed! Hit the minister's house | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

कोरोना इफेक्ट : राज्य माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात येणाऱ्या दहावीच्या परीक्षा रद्द
सातारा : कोयना परिसर भूकंपाच्या धक्क्याने हादरला. भुकंपाची साखळी वेळ-3.22 रिश्टर स्केल-3.00, वेळ-3.44 रिश्टर स्केल-2.8.

मराठा कार्यकर्ते कडाडले ! मंत्र्यांच्या घरावर धडकले

आनंद गायकवाड
शुक्रवार, 2 ऑक्टोबर 2020

शासनाने जर मराठा समाजाच्या वरील मागण्यांचा विचार न केल्यास भविष्यात समाजाला आक्रमक भूमीका घ्यावी लागेल. त्यास सर्वस्वी सरकार जबाबदार असेल.

संगमनेर : मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे, या मागणीसाठी सकल मराठा समाजाच्यावतीने महात्मा गांधी जयंती निमित्ताने लोकप्रतिनिधींच्या घरासमोर आंदोलन केले. संगमनेरात आज सकाळी 11 वाजता महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या घरासमोर सकल मराठा समाजाने जोरदार आंदोलन करत मराठा समाजासाठी आरक्षणाची मागणी केली. 

राज्य सरकारने पुनर्विचार याचिका दाखल केल्यास आरक्षणाच्या तात्काळ अंमलबजावणीचा मार्ग सुकर होऊ शकेल, सरकारने विशेष अधिवेशन बोलावून तातडीने अध्यादेश काढावा, नवीन सरकारी नोकर भरती तात्काळ थांबवावी आदी मागण्या या वेळी करण्यात आल्या. शासनाने जर मराठा समाजाच्या वरील मागण्यांचा विचार न केल्यास भविष्यात समाजाला आक्रमक भूमीका घ्यावी लागेल. त्यास सर्वस्वी सरकार जबाबदार असेल, असा इशाराही सकल मराठा समाजाच्यावतीने देण्यात आला आहे.

आंदोलनकर्त्यांचे निवेदन नायब तहसिलदार सुभाष कदम यांनी स्वीकारले. या वेळी आमदार डॉ. सुधीर तांबे, नगराध्यक्षा दुर्गा तांबे, अमोल खताळ, खंडू सातपुते, अमोल कवडे, राजेंद्र देशमुख, शरद नाना थोरात, इंद्रजीत थोरात, बाबा ओहोळ, निर्मला गुंजाळ, अर्चना बालोडे, अजय फटांगरे, रामहरी कातोरे, नवनाथ अरगडे, चंद्रकांत कडलग, अशोक सातपुते, तात्या कुटे आदी उपस्थित होते.

Edited By - Murlidhar Karale

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख