व्यापारी खून प्रकरणातील आरोपींच्या नावावर अनेक गंभीर गुन्हे : दिघावकर - Many serious crimes in the name of the accused in the murder case: Dighavakar | Politics Marathi News - Sarkarnama

व्यापारी खून प्रकरणातील आरोपींच्या नावावर अनेक गंभीर गुन्हे : दिघावकर

गाैरव साळुंके
मंगळवार, 9 मार्च 2021

अपहरण झालेल्या ठिकाणी, तसेच मृतदेह सापडलेल्या ठिकाणांना त्यांनी प्रत्यक्ष भेटी दिल्या. साक्षीदारांची विचारणा केली. तसेच मृत हिरण यांच्या मोबाईल लोकेशनचा आढावा घेतला.

श्रीरामपूर : बेलापूर येथील व्यापारी गौतम हिरण यांचे अपहरण व हत्याकांडाची आज नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक डॉ. प्रताप दिघावकर यांनी येथे येऊन माहिती घेतली. आरोपी गंगावणे व वायकर यांच्याविरुद्ध पूर्वीही अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. हिरण हत्या प्रकरणात पुढील तपास करुन गुन्ह्याचे कारण समोर आणू, असे त्यांनी सांगितेल.

अपहरण झालेल्या ठिकाणी, तसेच मृतदेह सापडलेल्या ठिकाणांना त्यांनी प्रत्यक्ष भेटी दिल्या. साक्षीदारांची विचारणा केली. तसेच मृत हिरण यांच्या मोबाईल लोकेशनचा आढावा घेतला. साक्षीदारांची माहिती व तांत्रिकी तपासानंतर संशयित आरोपी सागर गंगावणे व बिट्टू ऊर्फ रावजी वायकर यांना अटक केल्याचे डॉ. प्रताप दिघावकर यांनी पत्रकारांना सांगितले. 

हेही वाचा... जिल्हा बॅंकेचा कारभार काटेकोरपणे करा

येथील शासकीय विश्रामगृहात पोलिस महानिरीक्षक डॉ. दिघावकर यांनी आज पत्रकारांशी संवाद साधला. पोलिस अधीक्षक मनोज पाटील उपस्थित होते. डॉ. दिघावकर आज सकाळीच येथे आले. प्रारंभी बेलापुरात व्यापारी हिरण यांचे अपहरण झालेल्या ठिकाणास त्यांनी भेट दिली. नंतर तेथून मृतदेह आढळलेल्या ठिकाणी, वाकडी शिवारात जावून पाहणी करीत घटनेची माहिती घेतली. तेथून तातडीने शहर पोलिस ठाण्यात येऊन आरोपींकडे विचारणा केली.

पोलिस अधीक्षक पाटील यांच्यासह अपर पोलिस अधीक्षक डॉ. दीपाली काळे, पोलिस उपअधीक्षक संदीप मिटके, स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक अनिल कटके आदी उपस्थित होते. 

हेही वाचा... हे गृहखात्याचे अपयश ः विखे

लवकरच गुन्ह्याचे कारण समोर आणू 

डॉ. दिघावकर म्हणाले, की व्यापारी हिरण यांच्या हत्येप्रकरणी तांत्रिक पुराव्यांवरून पोलिसांनी दोन संशयितांना अटक केली. तशी माहिती राज्याच्या गृह विभागाला कळविली आहे. अपहरणासाठी, तसेच हिरण यांचा मृतदेह वाकडी शिवारात आणण्यासाठी वापरलेल्या वाहनाचा शोध घेत आहोत. आरोपी गंगावणे व वायकर यांच्याविरुद्ध पूर्वीही अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. हिरण हत्या प्रकरणात पुढील तपास करुन गुन्ह्याचे कारण समोर आणू. 

 

Edited By - Murlidhar Karale

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख