नगरमध्ये लाॅकडाऊनमधील या अटींमुळे अनेकजण संभ्रमात

एखाद्या दुकानासमोर पाच पेक्षा जास्त लोक अचानक असल्यास दुकानदारांवर कारवाई होऊ शकते. अचानक दुकानात आलेल्या ग्राहकांमुळे दुकानदार अडचणीत येतील, त्यामुळे अनेक दुकानदारांनी दुकाने बंद ठेवणेच पसंत केले.
Corona
Corona

नगर : केंद्र सरकारच्या आदेशाप्रमाणे 17 मे पर्यंत देशभर लाॅकडाऊन वाढविला आहे. नगर जिल्हा आॅरेंज झोनमध्ये असल्याने अनेक सेवा आज सुरू झाल्या आहेत. मात्र दुकाने खुली करताना सोशल डिस्टन्सी व गर्दी होऊ नये म्हणून पाच पेक्षा जास्त व्यक्तिंना एकत्र येण्यास नाही. अशा काही अटींमुळे अनेकजण संभ्रमात आहेत. त्यामुळे कापडबाजारात आज शुकशुकाट होता.

जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी काढलेल्या पत्रकानुसार अनेक सेवा आजपासून सुरू झाल्या आहेत. मात्र सोशल डिस्टन्स पाळताना पाचपेक्षा अधिक व्यक्तींना एकत्र येण्यास मनाई असल्यामुळे बाजार, यात्रा, समारंभ आदी बंद ठेवण्यात येणार आहेत.  इतर साहित्याची दुकाने आज सकाळपासून सुरू झाली. कापड बाजार मात्र पूर्ण बंद ठेवण्यात आला आहे. बाजारपेठेत जाणारे सर्व रस्ते बंद केल्यामुळे दुकानदार संभ्रमात पडले. आज सकाळी दुकानदार दारात येवून उभे राहिले, मात्र पोलिसांनी मनाई केल्यानंतर पुन्हा घरी गेले. एखाद्या दुकानासमोर पाच पेक्षा जास्त लोक अचानक असल्यास दुकानदारांवर कारवाई होऊ शकते. अचानक दुकानात आलेल्या ग्राहकांमुळे दुकानदार अडचणीत येतील, त्यामुळे दुकानदारांनी दुकाने बंद ठेवणेच पसंत केले.
 
या गोष्टींसाठी मनाई
लाॅक डाऊनच्या काळात सार्वजनिक ठिकाणी पाच किंवा त्यापेक्षा अधिक व्यक्तींना एकत्र येण्यास मनाई राहिल. वैद्यकीय सेवा, एअर अॅम्ब्युलन्स व सुरक्षा अथवा केंद्रीय गृह मंत्रालयाने अनुमती दिलेल्या हवाई प्रवासी वाहतूक व्यतिरिक्त सर्व प्रकारची देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय हवाई प्रवासी वाहतुकीस मनाई राहिल. सुरक्षा अथवा गृहमंत्रालयाने अनुमती दिलेल्या सर्व प्रकारची रेल्वे प्रवासी वाहतूक, बस सेवा, शाळा, महाविद्यालये, शैक्षणिक, प्रशिक्षण, कोचिंग क्लासेस हे बंद राहतील. सिनेमा हाॅल, शाॅपिंग माॅल, व्यायाम शाळा, क्राडी संकुले, जलतरण तलाव, मनोरंजन पार्क, नाट्यगृहे, बार, प्रेक्षागृहे, धार्मिक स्थळे, प्रार्थना गृहे बंद राहतील. सर्व प्रकारचे धार्मिक स्थळे, प्रार्थना स्थळे नागरिकांच्या प्रवेशासाठी बंद राहतील. काॅन्टेन्मेंट परिसरात ओपीडी व मेडिकल क्लिनिक चालविण्यास मनाई असेल. 

लाॅक डाऊनमध्ये हे चालू राहिल
कृषीविषयक सर्व कामे, तूर, कापूस, हरभरा खरेदी केंद्रे, कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे व्यवहार सुरू राहतील. फळे, भाज्या, धान्याच्या लिलावाच्या ठिकाणी केवळ घाऊक व्यापारी, नोंदणीकृत खरेदीदार, शेतकरी यांनाच मुभा असेल. परंतु तेथे सामाजिक अंतर, सॅनिटायझर, हॅण्ड वाॅश, हात धुण्यासाठी व्यवस्था आदी व्यवस्था करण्याची जबाबदारी बाजार समितीच्या सचिवाची असेल. कृषी विषयक दुकाने सुरू राहतील. खते, बियाणे यांची वाहतूक सुरळीत होईल. सरकारी, खासगी कार्यालयात 33 टक्के कर्मचारी उपस्थित राहतील. इलेक्ट्रानिक माध्यमे सुरू राहतील, परंतु सोशल डिस्टन्स ठेवून काम करावे. वृत्तपत्रांचे वितरण ग्राहकांच्या पूर्वसंमतीने सुरू रोहील. दारात वितरण करणाऱ्या वितरकाला मास्क लावणे बंधणकारक असेल. जीवनावश्यक वस्तुंची दुकाने सुरू राहतील. ग्रामीण भागातील माॅल वगळता सर्व दुकाने सुरू राहतील. परंतु सामाजिक अंतर नसल्यास दुकानदारांवर गुन्हे दाखल होतील. 
अल्पवयीन मुलांची निवारागृहे सुरू राहतील. अंगणवाडी सेविका दर पंधरा दिवसाला बालके, महिलांचा आहार घरपोहच देतील. दुग्धजन्य पदार्थांची विक्री, वाहतूक करणे सुरू राहिल. पेट्रोल विक्री सकाळी पाच ते नऊ वाजेपर्यंत सुरू राहिल. डिझेल विक्री मात्र नियमितपणे सरू राहिल. पोस्टल सेवा, कुरिअर सेवा सुरु होतील. दुष्काळ निवारणाची कामे सुरू होतील. 
चार चाकी वाहनामध्ये वाहन चालक व इतर दोन व्यक्तींना परवानगी असेल. दुचाकी वाहनांवर केवळ एकाच व्यक्तीला परवानगी आहे. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com