जिल्हा बॅंकेसाठी शरद पवारांनी दिला हा मंत्र ! 27 तारखेस ठरणार व्यूहनिती - This mantra was given by Sharad Pawar for District Bank! The strategy will be on the 27th | Politics Marathi News - Sarkarnama

जिल्हा बॅंकेसाठी शरद पवारांनी दिला हा मंत्र ! 27 तारखेस ठरणार व्यूहनिती

मुरलीधर कराळे
रविवार, 24 जानेवारी 2021

अकोले येथील कार्यक्रमानंतर शरद पवार नगर शहरात एका हाॅस्पिटलच्या उद्घाटनासाठी ते आले होते. प्रारंभी आमदार संग्राम जगताप यांच्या निवासस्थानी भोजन घेतले.

नगर : जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काॅंग्रेसची व्यूहनिती कशी असावी, याबाबत आज आमदार संग्राम जगताप यांच्या निवासस्थानी ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या उपस्थितीत चर्चा झाली. 27 तारखेस मुंबईत महाविकास आघाडीच्या नेत्यांची बैठक घेण्यात येणार असून, या वेळी या निवडणुकीबाबत चर्चा होणार आहे.

अकोले येथील कार्यक्रमानंतर शरद पवार नगर शहरात एका हाॅस्पिटलच्या उद्घाटनासाठी ते आले होते. प्रारंभी आमदार संग्राम जगताप यांच्या निवासस्थानी भोजन घेतले. या वेळी पवार यांच्या उपस्थितीत महत्त्वाच्या नेत्यांची बैठक घेतली.  या वेळी पालकमंत्री हसन मुश्रीफ, राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, आमदार निलेश लंके, आमदार लहू कानडे, आमदार आशुतोष काळे, जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, माजी आमदार नरेंद्र घुले, माजी आमदार राहुल जगताप, राष्ट्रवादी काॅंग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर घुले, जेष्ठनेते पांडुरंग आभंग आदी उपस्थित होते. 

महाआघाडीच्या सर्व नेत्यांनी एकत्र राहून जिल्हा बॅंकेची निवडणूक लढवावी, अशा सूचना या वेळी पवार यांनी उपस्थितांना दिल्या. या नियोजनासाठी येत्या २७ तारखेस मुंबईत बैठक घेऊ. या बैठकित उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, पालकमंत्री हसन मुश्रीफ मार्गदर्शन करतील. या बैठकीला जिल्ह्यातील सर्व प्रमुख नेत्यांनी मुंबईत यावे, असे त्यांनी सांगितले. चंद्रशेखर घुले यांनी निवडणुकीबाबत माहिती दिली.

जगताप कुटुंबियांनी केला सत्कार

आमदार जगपात कुटुंबियांच्या वतीने खासदार शरद पवार यांचा आमदार अरुण जगताप व आमदार संग्राम जगताप यांनी सत्कार केला. या वेळी पार्वती जगताप, जिल्हा परिषदेच्या सदस्या सुवर्णा जगताप, नगरसेविका शीतल जगताप, विलास जगताप, डाॅ. शशिकांत फाटके, डॉ. वंदना फाटके, वैभव जगताप, विकी जगताप आदी उपस्थित होते.

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख