नगरच्या पोलिस अधीक्षकपदी मनोज पाटील - Manoj Patil as the Superintendent of Police of the town | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

सरपंचपदाचे आरक्षण नव्यानेच होणार आणि प्रशासकांच्या कारभाराची चौकशीही होणार

नगरच्या पोलिस अधीक्षकपदी मनोज पाटील

मुरलीधर कराळे
शुक्रवार, 18 सप्टेंबर 2020

नगरचे पोलिस अधीक्षक अखिलेशकुमार सिंह यांची बदली झाली असून, त्यांच्या जागी मनोज पाटील यांची नियुक्ती झाली आहे. मनोज पाटील हे यापूर्वी सोलापूर ग्रामीणला पोलिस अधीक्षक म्हणून रुजू होते.

नगर : नगरचे पोलिस अधीक्षक अखिलेशकुमार सिंह यांची बदली झाली असून, त्यांच्या जागी मनोज पाटील यांची नियुक्ती झाली आहे. मनोज पाटील हे यापूर्वी सोलापूर ग्रामीणला पोलिस अधीक्षक म्हणून रुजू होते.  

अखिलेश कुमार सिंह हे नगरला अल्प काळ राहिले. त्यांनी एप्रिलमध्ये नगरचा पदभार घेतला होता. त्यांचा सर्व काळ लाॅकडाऊन व कोरोनाचा बंदोबस्त अशा कारणांसाठीच गेला. या काळात काही अपवाद वगळता मोठ्या गुन्हेगारीच्या घटना घटना घडल्या नाहीत. मात्र वाळुतस्करी, जुगार असे गुन्हे काही ठिकाणी घडले. 

पाटील यांच्यासमोह ही आव्हाने

नगरमधील गुन्हेगारी, पारनेर, श्रीगोंदे, राहुरी आदी ठिकाणची वाळुतस्करी अशा गुन्हेगारीचे मोठे आव्हान पाटील यांच्यासमोर आहेत. शिर्डी हे आंतरराष्ट्रीय पातळीवरील देवस्थान असल्याने तेथील गुन्हेगारीला आळा घालण्याचे काम पाटील यांना करावे लागणार आहे. सध्या कारोनाच्या काळात होणारे लाॅकडाऊन यशस्वी करण्यासाठी स्थानिक नेत्यांना मदत करण्याचे आव्हान लगेचच त्यांच्यासमोर येऊन ठाकणार आहे. या शिवाय नगरच्या नेत्यांचा पोलिस प्रशासनावर असलेला वचक पाटील कशा पद्धतीने कमी करू शकतात, हे काळच ठरविणार आहे. यापूर्वी विश्वास नांगरे पाटील, कृष्ण प्रकाश यांनी काही बड्या दिग्गजांना गजाआड केले होते. त्यामुळे नगरचे राजकारणी या अधीक्षकांना दचकून होते. त्यानंतर मात्र कोणत्याही अधीक्षकांना नेत्यांनी जुमानले नाही. अशा परिस्थितीत मनोज पाटील कशा पद्धतीने जिल्ह्यातील नेत्यांना हाताळतात हे काळच ठरविणार आहे.

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख