मनोज कोतकर पक्ष सांगण्यास असमर्थ ! पदभार घेताना भाजपची अनुपस्थिती - Manoj Kotkar unable to state party! Absence of BJP in office | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज रात्री ८ :४५ वाजता COVID परिस्थितीवर देशाला संबोधित करतील.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज रात्री ८ :४५ वाजता COVID परिस्थितीवर देशाला संबोधित करतील.
कोरोना इफेक्ट : राज्य माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात येणाऱ्या दहावीच्या परीक्षा रद्द
सातारा : कोयना परिसर भूकंपाच्या धक्क्याने हादरला. भुकंपाची साखळी वेळ-3.22 रिश्टर स्केल-3.00, वेळ-3.44 रिश्टर स्केल-2.8.

मनोज कोतकर पक्ष सांगण्यास असमर्थ ! पदभार घेताना भाजपची अनुपस्थिती

मुरलीधर कराळे
सोमवार, 28 सप्टेंबर 2020

आज सभापतीपदाचा पदभार घेताना मनोज कोतकर यांनी आपण कोणत्या पक्षात आहात, या प्रश्नाला बगल दिली. आपण शहराच्या विकासासाठी कटिबद्ध असल्याचे सांगून नागरिकांसाठी कामे करणार असल्याचे स्पष्ट केले.

नगर : महापालिकेच्या स्थायी समितीचे सभापती मनोज कोतकर नेमका कोणत्या पक्षाचे, हे सांगण्यास ते असमर्थ ठरले आहेत. आज पदभार घेताना त्यांनी या प्रश्नाला बगल दिली. दरम्यान, कोतकर यांनी भाजपच्या सदस्यत्त्वाचा राजीनामा दिलेला नसून, त्यांना खुलासा करण्याची नोटीस भाजपने बजावली आहे. आज कोतकर यांच्यासोबत केवळ राष्ट्रवादी काॅंग्रेसचे नगरसेवक उपस्थित होते. 

महापालिकेच्या स्थायी समितीच्या सभापतीपदाची नुकतीच निवड झाली. भाजपमधून अचानक राष्ट्रवादीत जाऊन मनोज कोतकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. राष्ट्रवादीच्या उमेदवाराचा अर्ज पाहून शिवसेनेेने महाविकास आघाडीचा धर्म पाळत पक्षाचा उमेदवार योगिराज गाडे यांचा अर्ज मागे घेतला. त्यामुळे कोतकर बिनविरोध सभापती झाले. हे प्रकरण येथेच थांबले नाही. कोतकर यांनी अद्याप पक्षाच्या सदस्यत्त्वाचा राजीनामा दिला नसल्याचे सांगून ते आपल्याच पक्षात असल्याचा दावा भाजपने केला. तर पक्षाने अधिकृतपणे कोतकर यांना नोटीस पाठवून, तुम्ही कोणत्या पक्षात आहात, हे विचारले आहे. येत्या दोन दिवसांत कोतकर यांचे उत्तर मिळाले नाही, तर त्यांच्यावर कारवाई करण्याचा इशारा भाजपने दिला आहे.

राष्ट्रवादी काॅंग्रेसनेही कोतकर हे आपल्याच पक्षाचे असल्याचे दाखवून दिले आहे. याच कारणाने शिवसेनेने त्यांच्या उमेदवाराचा अर्ज मागे घेतला. शिवाय आज पदभार स्विकारताना कोतकर यांच्यासोबत केवळ राष्ट्रवादी काॅंग्रेसचेच नगरसेवक उपस्थित होते. भाजपचे नगरसेवक तेथे फिरकले नाहीत.

कोतकर यांच्याकडून विषयाला बगल

दरम्यान, आज सभापतीपदाचा पदभार घेताना मनोज कोतकर यांनी आपण कोणत्या पक्षात आहात, या प्रश्नाला बगल दिली. आपण शहराच्या विकासासाठी कटिबद्ध असल्याचे सांगून नागरिकांसाठी कामे करणार असल्याचे स्पष्ट केले. परंतु पक्षाबाबत काहीही बोलण्यास त्यांनी असमर्थता दर्शविली.

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख