`मन की बात`मध्ये पंतप्रधान मोदी यांनी दिला नवतंत्रज्ञान वापराचा मंत्र

दिल्लीत आमच्या राष्ट्रीय संग्राहलयाद्वारे 10 व्हर्च्युअल गॅलरीचे काम झाले आहे. आपण घरी बसून दिल्लीच्या नॅशनल संग्रहालयाची सहल करू शकता. नवीन तंत्रज्ञानाचा वापर आगामी काळात महत्त्वपूर्ण आहे.
`मन की बात`मध्ये पंतप्रधान मोदी यांनी दिला नवतंत्रज्ञान वापराचा मंत्र
narendra-modi--1-f.jpg

नगर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी `मन की बात` या कार्यक्रमात आज सकाळी देशातील नवीन तंत्रज्ञानाला विशेष महत्त्व दिले. देशातील शेतकरी, युवा पढीला विशेष प्रोत्साहन देत त्यांनी देशातील अनेक उदाहरणे देऊन तंत्राचे महत्त्व पटवून दिले. त्याचप्रमाणे भारतीय संस्कृती, ऐतिहासिक ठेवा जतन करीत त्याचे डिजिटलायझेन करून लोकांना त्याची सहल केल्याचा आनंद मिळावा, अशी व्यवस्था करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. शेतकऱ्यांसाठी केलेल्या नवीन तरतुदीचा त्यांनी उल्लेख केला.

व्हर्च्युअल गॅलरीचे काम

पंतप्रधान मोदी म्हणाले, दिल्लीत आमच्या राष्ट्रीय संग्राहलयाद्वारे 10 व्हर्च्युअल गॅलरीचे काम झाले आहे. आपण घरी बसून दिल्लीच्या नॅशनल संग्रहालयाची सहल करू शकता. नवीन तंत्रज्ञानाचा वापर आगामी काळात महत्त्वपूर्ण आहे. नाॅर्वेच्या उत्तरेला साॅलमार्ट नावाचे एक द्विप आहे. तेथे एक प्रकल्प बनविण्यात येत असून, बहुमुल्य डेटा तयार करण्यात येत आहे. सध्या अजिंठा गुहांचे डिजिटलायझेशन करण्यात येत आहे. त्यामुळे तेथील माहिती सर्वांना घरी बसून घेता येईल, तसेच तेथे सहल केल्याचा आनंद मिळू शकेल.  

जागतिक महामारीमुळे आपले जीवनाकडे पाहण्याचा दृष्टीकोण बदलला आहे. निसर्गाचे महत्त्व अधिक कळाले आहे. प्रकृतीचे, निसर्गाचे वेगवेगळे रंग पाहण्यास मिळत आहेत. मेघालय हे स्वर्गासारखे सुंदर आहे. तेथील चित्र पाहून आपल्याला अनुभव येऊ शकेल.

पक्षीनिरीक्षकांच्या कामाचा गाैरव

12 नोव्हेंबरपासून डाॅ. सलीम अली यांचा 125 जयंती महोत्सव सुरू आहे. त्यांनी पक्षनिरीक्षणात विशेष काम केले आहे. मी कायम पक्षी मित्रांना कायम धन्यवाद देतो. मला पक्षाचे निरीक्षण करायला आवडते. पक्षीमित्रांनी पक्षी निरीक्षण करून त्याची सखोल माहिती इतरांना द्यावी.

भारताची संस्कृती आणि शास्त्र कायम जगभरातील आकर्षण राहले आहे. अनेकजण भारतात आले आणि येथेच थांबले. जाॅन्स मेसिटे यांना विश्वनाथ यांच्या नावाने ओळखले जाते. ते विश्वसंस्था चालवितात. जाॅनसने मॅकेनिकल इंजिनिअरिंगनंतर स्टाॅक मार्केटमध्ये काम केले. त्यांनी वेदांतचा विशेष अभ्यास केला. चार वर्षे त्यांनी कोईमतूरमध्ये राहून शिक्षण घेतले. त्यांचे एक वैशिष्ट्य म्हणजे आपल्या संदेशाला पोहचण्यासाठी ते आधुनिक टेक्नाॅलाॅजीचा वापर करतात. मागील सात वर्षात त्यांनी मोफत अभ्यासक्रमाच्या माध्यमातून सुमारे दीड लाख लोकांना प्रशिक्षित केले आहे. कोरोनाच्या काळात वेदांत कशी मदत करेल, याबाबत अधिक अभ्यास होण्याची गरज आहे. 

न्यूझीलंडमध्ये त्यांची संस्कृतमधून शपथ

न्यूझीलॅंडमधील नेते गाैरव शर्मा यांनी प्राचीण भाषा असलेल्या संस्कृत भाषेतून शपथ लोकप्रनिधीची शपथ घेतली. भारतीय संस्कृतीची महत्त्वाची भाषा असलेल्या या संस्कृतमधून शपथ घेतल्याने मी त्यांचे खास अभिनंदन करतो.

गुरुनानकांचे विचार विशेष भावतात

30 नोव्हेंबरला गुरुनानक यांच्या 505 व्या जयंतीनिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन होत आहे. प्रकाशपर्व कार्यक्रमातून त्यांचे विचार लोकांपर्यंत जाणार आहेत. त्यांनी सिंगापूरपासून साऊथ आफ्रिकेपर्यंत विचार मांडले. गुरू ग्रंथ साहेबमध्ये सेवेचे महत्त्व सांगितले आहे. सेवकाच्या माध्यमातून खूप काही करण्याचे मला भाग्य लागले. गुरूसाहबांची माझ्यावर विशेष कृपा राहिली आहे. मला माझ्या कामात त्यांच्या विचारांची खूप मदत होते. भुकंपाच्या काळात एका गुरूद्वारेचे नुकसान झाले. मी तेथील जिर्णोद्धार केला. पुन्हा त्याला वैभव प्राप्त करून दिले. आपल्याला गुरुसाहेबांचा मोठा आशिर्वाद मिळाला. मी मुख्यमंत्री नसतानाही गुरुद्वारात जाण्याचे भाग्य मिळाले. प्रत्येक जण तेथे जाण्याने धन्य होतात. गुरूसाहेबांनी माझ्याकूडन निरंतन सेवा करूतन घेतली. मी माझ्या जीवनात व ह्यदयात ही बात लिहून ठेवली आहे. परदेशात राहणाऱ्या शिख बांधवांना मदत देण्याचे काम अधिक सोपे होणार आहे. गुरुनानक यांनी लंगरची परंपरा सुरू केली. आज आपण पाहले, जगभरातील शिख बांधवांनी अन्नछत्राची परंपरा चालू ठेवली आहे. माझी इच्छा आहे, की आपण सर्व सेवकांच्या माध्यमातून सेवा करीत राहू.

विद्यार्थ्यांच्या चर्चेतून भारताचे दर्शन

मागील काही दिवसांत काही विद्यापीठांच्या विद्यार्थ्यांशी संवाद करता आला. आयआयटी गुहावटी, आयआयटी दिल्ली, गांधीनगरची पेट्रोलियम विद्यापीठ आदी ठिकाणच्या युवकांशी संपर्क केल्याने भारताचे दर्शन होते. अधिक ताजे-तवाने वाटते. अशा विद्यार्थ्यांच्या भेटीमुळे मला नवीन संकल्पाची प्रेरणा मिळते. आपल्या शालेय जीवनातील आठवणी कधी आपण विसरत नाहीत. या काळात केलेल्या कर्तुत्त्वामुळे नवीन संकल्पना जन्म घेतात. त्यामुळेच देशाचा विकास घडतो.

आयआयटी दल्लीने एका निधीची व्यवस्था केली आहे.  त्याद्वारे गरीब विद्यार्थ्यांची मदत होते. मला वाटते भारतातील प्रत्येक लहान-मोठ्या शाळा, विद्यालयांच्या माजी विद्यार्थ्यांनी आपापल्या शाळांचा, महाविद्यालयांच्या विकासात योगदान दिले पाहिजे.

स्वदेशीचा वापर आवश्यक

अरविंददेव यांची 5 डिसेंबरला पुण्यतिथी आहे. त्यांचे विचार आमलात आणा. आपण जसे लोकलसाठी ग्लोकल म्हणतो, त्याचे महत्त्व आता पटवून दिले पाहिजे, असे म्हणून मोदी यांनी बंगाली भाषेतील एक कविता म्हणून दाखविली. तिचा अर्थ सांगताना स्वदेशीचा वापर किती महत्त्वाचा आहे, हे विषद केले.

शेतकऱ्यांचे प्रयोग प्रेरणादायी

भारतात शेती व तंत्रज्ञान वाढत आहे. शेतकऱ्यांसाठी नवीन द्वारेच खुली होत आहेत. अनेक वर्षांपासून शेतकऱ्यांची मागणी होती, त्या मागण्या पूर्ण झाल्या आहेत. भारताच्या संसदेत शेतीसुधार कायद्यात विविध नव्याने तरतूदी झाल्या. त्यामुळे शेतकऱ्यांना नवीन अधिकार मिळाले. धुळे येथील जितेंद्र भोजी या शेतकऱ्याने मक्याची शेती केली. त्याने एका व्यापाऱ्याला ती मका विली. 3 लाख 32 हजार रुपयांना ठरले. त्यापैकी 25 हजार त्याला रोख देण्यात आले. बाकीचे पैसे त्यांना 15 दिवसांत मिळणार होते. 4 महने उलटले, तरीही पेमेंट मिळाले नव्हते. त्याने नवीन कायद्याचा आधार घेतला. त्यामुळे त्याला त्याचे पैसे मिळाले. नवीन कायदे अशा वेळी कामे येईल. नवीन शेती कायद्यानुसार शेतीमाल विकल्यानंतर तीन दिवसांच्या आत त्याचे पैसे संबंधित शेतकऱ्याला मिळाले पाहिजे, अशी तरतूद करण्यात आली आहे.

राजस्तानमधील मोहंमद अस्लम. त्यांनी विविध सोशल मीडियाचे ग्रुप बनवून शेतीविषयक माहिती इतरांना दिली जाते. त्यांचे स्वतंत्र अॅपही आहे. विरेंद्र यादव आॅस्ट्रेलियात राहतात. नंतर ते हरियानामध्ये आले. त्यांच्यापुढे शेतीविषयक समस्या होती. त्यांनी नवीन प्रयोग केले. विरेंद्र यांनी नवीन तंत्राचा वापर करून अॅग्रो एनर्जी प्लॅंट बनविला. त्याने तब्बल 2 करोडपेक्षा जास्त व्यापार केला. त्याला 50 लाख रुपयांचा नफा झाला. युवकांनी विशेषतः शेतीविषयक अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांनी शेतावर जाऊन शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले पाहिजे. नवीन तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहचविले पाहिजे. 

6 डिसेंबरला डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांची पुण्यतिथी आहे. त्यांनी जे शिकविले, त्याचा अभ्यास करून अनुकरण करावे.

कोरोनापासून सावध रहा, सुरक्षित रहा

कोरोनाची माहिती जगाला मिळाल्याचे आता एक वर्ष पूर्ण झाले आहे. त्या काळात जगाने अनेक चढ-उतार पाहिले. त्या वेळी कोरोनाचीच चर्चा होती. आता लसीकरणाची आहे. या लढाईत सावध राहिले पाहिजे.  सध्या थंडीचे दिवस आहेत. लहान मुले, ज्येष्ठ नागरिक, आजारी व्यक्तींची विशेष काळजी घ्या. गरजुंना गरम कपडे द्या. युवा पिढी अशा कामात कायम अग्रेसर असते. पुढील मन की बातमी या वर्षाच्या शेवटी करू. सर्वांनी सुखी रहा, सुरक्षित रहा, अशा शुभेच्छा मोदी यांनी दिल्या.
 

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in