देशमुखांच्या जागी आमदार संग्राम जगताप यांना मंत्री करा, नगरमध्ये राष्ट्रवादीचा ठराव - Make MLA Sangram Jagtap a minister in place of Deshmukh, NCP's resolution in the city | Politics Marathi News - Sarkarnama

देशमुखांच्या जागी आमदार संग्राम जगताप यांना मंत्री करा, नगरमध्ये राष्ट्रवादीचा ठराव

मुरलीधर कराळे
शुक्रवार, 11 जून 2021

राष्ट्रवादीच्या कोट्यातील एक मंत्रीपद कमी झाले आहे. चार विधानसभा सदस्यांमागे एक मंत्रीपद असा फाॅर्म्युला तयार करण्यात आला होता. मात्र नगर जिल्ह्यात सहा आमदार असतानाही केवळ प्राजक्त तनपुरे यांनाच मंत्रीपदावर संधी देण्यात आली.

नगर : महाराष्ट्रभर गाजलेल्या खंडणी वसुलीच्या आरोपावरून तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांना पदावरून पायउतार व्हावे लागले. त्यांच्या जागीराष्ट्रवादीचे नगर येथील आमदार संग्राम जगताप (Sangram Jagtap) यांना मंत्री करावी, अशी मागणी करणारा ठराव काल राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनानिमित्त नगरमध्ये करण्यात आली. (Make MLA Sangram Jagtap a minister in place of Deshmukh, NCP's resolution in the city)

राष्ट्रवादीच्या कोट्यातील एक मंत्रीपद कमी झाले आहे. चार विधानसभा सदस्यांमागे एक मंत्रीपद असा फाॅर्म्युला तयार करण्यात आला होता. मात्र नगर जिल्ह्यात सहा आमदार असतानाही केवळ प्राजक्त तनपुरे यांनाच मंत्रीपदावर संधी देण्यात आली. हा एकप्रकारे जिल्ह्यावर झालेला अन्याय आहे. त्यामुळे आमदार जगताप यांना देशमुखांच्या जागी संधी मिळावी, अशी मागणी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी केली आहे.

जगताप यांना मंत्रीपद मिळावे

आमदार संग्राम जगताप यांनी जिल्ह्यात महत्त्वकांक्षी काम केले आहे. कोरोनाच्या काळात नगरकरांना दिलासा देणारे निर्णय घेण्यात आले. एक तरुण आमदार तसेच प्रश्नांची जाण असलेला नेता असल्याने त्यांना मंत्रीपदावर संधी मिळावी, अशी मागणी नगर जिल्ह्यातील राजकीय तसेच सर्वसामान्य नागरिकांची आहे. तसा ठराव नुकताच करण्यात आला आहे. याबाबत राज्यपातळीवर निर्णय व्हावी, अशी अपेक्षा आहे, असे मत राष्ट्रवादी काॅंग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष प्रा. माणिक विधाते यांनी व्यक्त केले.

 

हेही वाचा..

जिल्हाधिकारी भोसले यांचे आदेश

नगर : जिल्ह्यातील निर्बंध शिथील केल्यानंतर सार्वजनिक ठिकाणी गर्दी वाढल्याचे चित्र आहे. मात्र, याठिकाणी विनामास्क फिरणाऱ्या आणि कोविड सुसंगत वर्तणुकीचे पालन करण्यास टाळाटाळ करणाऱ्या व्यक्ती आणि आस्थापनांवर कडक कारवाई करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी महानगरपालिका आणि तालुकास्तरीय यंत्रणांना दिले आहेत. नागरिकांनी सार्वजनिक ठिकाणी शिस्त न पाळण्यास कोरोना संसर्ग वाढल्यास पुन्हा निर्बंध लागू शकतील. त्यामुळे सर्वांनी नियमांचे पालन करावे, असे आवाहनही त्यांनी केले आहे.

जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांनी काल तालुकास्तरीय यंत्रणांशी दूरदृश्यप्रणाली द्वारे संवाद साधला. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी संदीप निचित, नोडल अधिकारी उपजिल्हाधिकारी डॉ. अजित थोरबोले, उर्मिला पाटील, पल्लवी निर्मळ, जयश्री आव्हाड, रोहिणी नऱ्हे,  जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुनील पोखरणा, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संदीप सांगळे, जिल्हा साथरोग सर्वेक्षण अधिकारी डॉ. दादासाहेब साळुंके, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी डॉ. विरेंद्र बडदे, हे जिल्हा मुख्यालय तर तालुका स्तरावरील महसूल, पोलीस, ग्रामविकास, आरोग्य आणि नगरविकास विभागाचे अधिकारी दूरदृश्यप्रणालीद्वारे उपस्थित होते. 

 

 

हेही वाचा..

पारनेरमध्ये जनता कर्फ्यू

 

 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख