ग्रामपंचायती बिनविरोध करा अन 2६ लाख घ्या ! आमदार डाॅ. लहामटे यांची घोषणा - Make Gram Panchayat unopposed and get Rs 26 lakh! MLA Dr. Lahamate's announcement | Politics Marathi News - Sarkarnama

ग्रामपंचायती बिनविरोध करा अन 2६ लाख घ्या ! आमदार डाॅ. लहामटे यांची घोषणा

शांताराम काळे
शनिवार, 19 डिसेंबर 2020
पारनेरचाच कित्ता अकोले तालुक्यात गिरविण्याचा प्रयत्न आमदार लहामटे करीत आहेत. आदिवासी पट्ट्यातील या ग्रामपंचायती लहान असून, बिनविरोध करणे सोपे आहे. त्यासाठी कार्यकर्त्यांनी प्रयत्न करावेत, असे आवाहन त्यांनी केले आहे.

अकोले : तालुक्‍यातील ज्या ग्रामपंचायती शासनाचा खर्च टाळून निवडणुका बिनविरोध करतील, त्या गावांना विकासकामांसाठी 26 लाखांचा निधी देणार असल्याची माहिती आमदार डॉ. किरण लहामटे यांनी दिली.

अकोले विधानसभा मतदारसंघातील 52 ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचे बिगुल वाजले असून, या ग्रामपंचायतींची सत्ता मिळविण्यासाठी महाविकास आघाडी विरुद्ध भाजप, असा सामना होत आहे. ज्या ग्रामपंचायती बिनविरोध होतील, त्यांना विकासकामांसाठी 26 लाख रुपये देणार असल्याची घोषणा आमदार लहामटे यांनी केली.

खासदार शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त अकोल्यात विविध कार्यक्रम झाले. त्याच्या सांगता कार्यक्रमात ते बोलत होते. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष भानुदास तिकांडे, राष्ट्रवादी महिलाध्यक्ष स्वाती शेणकर, सचिव विकास बंगाळ उपस्थित होते.

दरम्यान, जिल्ह्यात राष्ट्रवादी काॅंग्रेसचे आमदार निलेश लंके यांनी यापूर्वीच २५ लाखांचे बक्षिस पारनेर विधानसभा मतदारसंघात जाहीर केले आहे. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या मार्गदर्शनाखाली राळेगणसिद्धी या गावाची निवडणूक बिनविरोध करण्याचा निर्णय झाला असून, इतरही गावे बिनविरोध करण्याचा निर्णय लंके यांनी घेतला आहे.

पारनेरचाच कित्ता अकोले तालुक्यात गिरविण्याचा प्रयत्न आमदार लहामटे करीत आहेत. आदिवासी पट्ट्यातील या ग्रामपंचायती लहान असून, बिनविरोध करणे सोपे आहे. त्यासाठी कार्यकर्त्यांनी प्रयत्न करावेत, असे आवाहन त्यांनी केले आहे.

Edited By - Murlidhar Karale

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख