कोरोनाच्या नावाखाली भंडारदरा धरणाची देखभाल थंडावली, भिंतीवर वाढले गवत

उत्तर नगर जिल्ह्याची जीवनदायिनी असणाऱ्या भंडारदरा जलाशयात 5 हजार 295 दशलक्ष घनफुट इतका साठा असून, १०७ दशलक्ष घनफूट आवक झाली आहे.
bhandardara.png
bhandardara.png

अकोले : नगर जिल्ह्याचेच नव्हे, तर महाराष्ट्रातील पर्यटकांचे आकर्षण असलेले भंडारदरा धरणाच्या भिंतीवर मोठ्या प्रमाणात गवत वाढले आहे. कोरोनाच्या नावाखाली संबंधित कर्मचाऱ्यांचे व अधिकाऱ्यांचे मात्र इकडे दुर्लक्ष होताना दिसत आहे. दरवर्षीप्रमाणे हे गवत काढण्याचे काम कर्मचारी विसरलेली की काय, असा सवाल उपस्थित होत आहे.

उत्तर नगर जिल्ह्याची जीवनदायिनी असणाऱ्या भंडारदरा जलाशयात 5 हजार 295 दशलक्ष घनफुट इतका साठा असून, १०७ दशलक्ष घनफूट आवक झाली आहे. 47.95 टक्के जलाशय भरले आहे. पाऊस उघडल्याने पाण्याची आवक मंदावली आहे असली, तरी घाटघर ४४, पंजारे २९, रतनवाडी २४ , भंडारदरा १५ मिलिमीटर पावसाची आज नोंद झाली. त्यामुळे पाणीसाठा वाढत आहे. उत्तर नगर जिल्ह्याला सुजलाम सुफलाम करणाऱ्या या जलाशयाची दुरवस्था पाहताना अनेकजण चिंता व्यक्त करीत आहेत. ज्या धरणाच्या पाण्याने हजारो संसार उभारले, तोच जलाशय आज दुर्लक्षित होत असताना दिसत आहे.

पुढाऱ्यांच्या राजकारणात भंडारदरा जलाशय हा महत्वाचा मुद्दा असताना पुढारी, अधिकारी कर्मचारी यांनी पाठ फिरवली आहे. आज भंडारदरा जलाशय शंभरी पूर्ण करण्याच्या उंबरठ्यावर असताना त्यांच्या अंग खांद्यावर गवत उगवले असून, ते साफ करण्यासाठी सवड कुणालाच नाही, याबाबत भंडारदरा जलाशयावर भेटलेल्या एक वरिष्ठ कर्मचाऱ्याला विचारले, त्यांनी प्रतिक्रिया देताना सरकारी लालफितीचा कारभार उघडच केला. 

कोरोनामुळे पत्रव्यवहार ठप्प

संबंधित कर्मचारी म्हणाले, ``काय करणार, जलाशयाच्या देखभालीसाठी निधीच उपलब्ध नाही. काम कसे करायचे. वरिष्ठ कार्यालयाला पत्रव्यवहार व प्रस्ताव पाठविला आहे. त्यांचे कोरोनामुळे उत्तर नाही. मात्र ज्या भंडारदरा जलाशयाच्या देखभालीसाठी चार डझन मजूर उपलब्ध असताना जलाशयाच्या अंग खांद्यावर वाढलेले गवत काढायला काय अडचण, तिथे कुठे आला निधीचा प्रश्न.``

यंदा पर्यटकांविना रोजगार बुडणार

या वर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर धरणावर गर्दी करण्यावर मनाई होणार आहे. तसेच पर्यटकही बाहेर पडणार नसल्याने धरणावरील मनोहर धबधब्यांचा आनंद घेण्यासाठी पर्यटक फिरकणार नाही. त्यामुळे आसपासच्या लोकांचा रोजगार बुडणार आहे. दरवर्षी स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी भरपूर गर्दी असते. त्यामुळे स्थानिकांना चांगला रोजगार निर्माण होतोे. या वर्षी मात्र हे उत्पन्न बुडणार आहे.

Edited By - Murlidhar Karale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com