नगर तालुक्‍यातील 53 ग्रामपंचायतींत महिलाराज  - Mahilaraj in 53 gram panchayats of Nagar taluka | Politics Marathi News - Sarkarnama

नगर तालुक्‍यातील 53 ग्रामपंचायतींत महिलाराज 

दत्ता इंगळे
गुरुवार, 28 जानेवारी 2021

59 ग्रामपंचायतींच्या निवडणुका नुकत्याच पार पडल्या. उर्वरित 46 ग्रामपंचायतींच्या निवडणुका आगामी काळात होणार आहेत. तालुक्‍यातील या 105 गामपंचायतींपैकी 53 ग्रामपंचायतींवर महिलाराज असणार आहे. 

नगर तालुका : तालुक्‍यातील 105 ग्रामपंचायतींच्या सरपंचपदांसाठी आरक्षण सोडत आज न्यू आर्टस महाविद्यालयाच्या राजर्षी शाहू महाराज सभागृहात उपविभागीय अधिकारी श्रीनिवास अर्जुन व प्रशिक्षणार्थी उपजिल्हाधिकारी गणेश पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आली. यातील 59 ग्रामपंचायतींच्या निवडणुका नुकत्याच पार पडल्या. उर्वरित 46 ग्रामपंचायतींच्या निवडणुका आगामी काळात होणार आहेत. तालुक्‍यातील या 105 गामपंचायतींपैकी 53 ग्रामपंचायतींवर महिलाराज असणार आहे. दरम्यान, महाराष्ट्रातही अशा पद्धतीचे आरक्षण अनेक ठिकाणी निघाले आहे.

आरक्षण असे ः 
अनुसूचित जाती स्त्री-राखीव - बाबुर्डी घुमट, रांजणी, पारेवाडी (पारगाव), सारोळा बद्दी, पिंपळगाव माळवी, भोयरे खुर्द, गुंडेगाव व रुईछत्तिशी . 
पुरुष - खारेकर्जुने, शिराढोण, दशमीगव्हाण, गुणवडी, उदरमल, घोसपुरी, खातगाव टाकळी, हमीदपूर, 
अनुसूचित जमाती स्त्री-राखीव- धनगरवाडी, बुरुडगाव 
पुरुष- पिंप्री घुमट. 
नागरिकांचा मागास प्रवर्ग स्त्री-राखीव- भातोडी पारगाव, राळेगण, बाराबाभळी, कौडगाव, पिंपळगाव वाघा, कापूरवाडी, पिंपळगाव उज्जैनी, देवगाव, दरेवाडी, निमगाव वाघा, सारोळा कासार, बाबुर्डी बेंद, शेंडी, पिंपळगाव लांडगा. 
पुरुष- माथणी (बाळेवाडी), मदडगाव, सोनेवाडी (पिंपळगाव), नवनागापूर, वडगाव तांदळी, चास, वाटेफळ, हिवरेझरे, मांडवे, आंबिलवाडी, वाळकी, टाकळी काझी, साकत खुर्द, सोनेवाडी (चास). 
सर्वसाधारण स्त्री-राखीव - डोंगरगण, वारूळवाडी, बारदरी, नारायणडोह, हिंगणगाव, नेप्ती, आठवड, दहिगाव, मजले चिंचोली, निमगाव घाणा, जेऊर, निंबोडी, कोल्हेवाडी, टाकळी खातगाव, भोयरे पठार, वडारवाडी, रतडगाव, आगडगाव, वाकोडी, हिवरेबाजार, वडगाव गुप्ता, देहरे, उक्कडगाव, पिंपळगाव कौडा, मेहेकरी, बहीरवाडी, देऊळगाव सिद्धी, इसळक, मांजरसुंबे. 
पुरुष- नांदगाव, इमामपूर, आरणगाव, खंडाळा, पारगाव मौला, हातवळण, नागरदेवळे, चिचोंडी पाटील, भोरवाडी, आव्हाडवाडी, सांडवे, अकोळनेर, बुऱ्हाणनगर, पोखर्डी, खोसपुरी, पारगाव भातोडी, खांडके, पांगरमल, तांदळी वडगाव, शिंगवे, विळद, जखणगाव, वाळुंज, निंबळक, मठपिंप्री, ससेवाडी, कामरगाव, शहापूर केकती, खडकी. 

 

Edited By - Murlidhar Karale

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख