मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री चाैहान यांनी मारला हातगाडीवरील वडापाववर ताव - Madhya Pradesh Chief Minister Chaihan hit a fever on a handcart | Politics Marathi News - Sarkarnama

मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री चाैहान यांनी मारला हातगाडीवरील वडापाववर ताव

विनायक दरंदले
शनिवार, 2 जानेवारी 2021

मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान व परिवाराने बरोबर बंदोबस्ताचा मोठा लवाजमा असतानाही सोनईतील एका वडापावच्या हातगाडीवर थांबून वडापावची चव चाखली.

सोनई : मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान व परिवाराने बरोबर बंदोबस्ताचा मोठा लवाजमा असतानाही सोनईतील एका वडापावच्या हातगाडीवर थांबून वडापावची चव चाखली.

मुख्यमंत्री चोहान यांच्यासह पत्नी साधना व मुले कृणाल व कार्तिकेयसह शनिदर्शन आटोपून शिर्डीकडे जात असताना बसस्थानक परिसरात वडापाव खाण्यासाठी थांबले. वनिता व वैष्णवी कुसळकर यांनी त्यांचे औषण केले. अशोक कुसळकर यांनी त्यांचा सन्मान केला. या वेळी गणेश, संदीप, गंगाराम, जगदिश व सागर कुसळकर उपस्थित होते.

सुरक्षा आणि बंदोबस्ताची कितीही अडचण असली, तरी जेथे आनंदाचे क्षण आहेत, तेथे मी आवर्जून जातो. येथील वडापावची चव हवीहवीशी असल्याने येथे अस्वाद घेतला. असे मुख्यमंत्री चौहान यांनी सांगितले. शिर्डी आणि शनिदर्शनाने वर्षभराची उर्जा येत असल्याने न चुकता पंधरा वर्षापासून एक जानेवारीचीवारी चुकवत नाही, असेही त्यांनी सांगितले.

दरम्यान, आज नववर्षानिमित्त शनिशिंगणापुरला एक लाख भाविकांनी भेट देवून स्वयंभू शनिमुर्तीचे दर्शन घेतले. मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसींह चौहान यांनी सायंकाळच्या आरतीला उपस्थित राहून दर्शन घेतले.

सायंकाळी सहा वाजता मुख्यमंत्री चौहान यांनी आपल्या परीवारासह उदासी महाराज मठात अभिषेक करुन आरती घेतली. देवस्थान ट्रस्टच्या वतीने विश्वस्त अप्पासाहेब शेटे यांनी त्यांचा सत्कार केला. या वेळी विश्वस्त प्रा. शिवाजी दरंदले, विकास बानकर, भागवत बानकर, बाळासाहेब बोरडे, सुनिता आढाव उपस्थित होते. देशावर आलेलं कोरोनाचं संकट लवकर जावो, अशी प्रार्थना शनिदेवाला केल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

नवीन वर्षाच्या निमित्ताने आज सकाळपासून सुरु झालेली गर्दी रात्री उशिरापर्यंत सुरुच होती. ब्राम्हणी, वंजारवाडी, सोनई व शिंगणापुरात अनेकदा वाहतूक कोंडी झाली होती. सायंकाळी दर्शनपथ गर्दीने हाऊसफुल्ल झाला होता. रस्त्यावर, गावात व प्रवासी करनाक्यावर लटकूंनी मोठ्या प्रमाणात भक्तांना त्रास देवूनही दिवसभरात पोलिस यंत्रणेने एकही कारवाई केली नाही हे विशेष.

 

Edited By - Murlidhar karale

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख