Look .. Pawar's grandson is driving a rickshaw! | Sarkarnama

बघ बया.. पवार साहेबांचा नातू रिक्षा चालीवतोय!

निलेश दिवटे
शनिवार, 20 जून 2020

टाकळी खंडेश्वरी येथील सुरवसे कोळीवस्ती येथे स्वातंत्र्य मिळाल्यानंतर अद्याप मतदारसंघाचे आमदार आले नव्हते. आज आमदार रोहित पवार येणार म्हणून मोठी उत्सुकता होती. तसेच मोठी गर्दीही जमली होती.

कर्जत : टाकळी खंडेश्वरी येथील सुरवसे कोळीवस्तीत यापूर्वी केव्हाच कोणत्याच आमदारांचे पाय लागले नव्हते. मात्र आमदार रोहित पवार येणार म्हणून नागरिकांना प्रचंड उत्सुकता होती. ते आले. जवळच उभ्या असलेल्या रिक्षा चालकाची विचारपूस केली. रिक्षा चालू करून स्वतः चालविली. हे पाहून उपस्थित आवाक झाले. रस्त्याच्या बाजुच्या आजीबाई म्हणाल्या, ``बघ बया, पवार साहेबांचा नातू कसा रिक्षा चालीवतोय.`` 

टाकळी खंडेश्वरी येथील सुरवसे कोळीवस्ती येथे स्वातंत्र्य मिळाल्यानंतर अद्याप मतदारसंघाचे आमदार आले नव्हते. आज आमदार रोहित पवार येणार म्हणून मोठी उत्सुकता होती. तसेच मोठी गर्दीही जमली होती. ते प्रत्यक्ष कसे दिसतात, कसे वागतात, याबद्दल प्रचंड उत्सुकता होती. मात्र त्यांचा साधेपणा आणि आपुलकीने केलेली विचारपूस, सहज संवाद कौशल्य सर्वांनाच भावले. 

कर्जत तालुक्यातील टाकळी खंडेश्वरी येथे एका कुटुंबाला भेटण्यासाठी आमदार रोहित पवार आले होते. या वेळी त्यांच्या समवेत काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रा. किरण पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य प्रवीण घुले व अॅड. कैलास शेवाळे, बापूसाहेब काळदाते, किशोर तापकीर, डॉ. सागर ढोबे आदी उपस्थित होते.

भेट संपून बाहेर पडल्यानंतर आमदार पवार यांना रस्त्याच्या कडेला एक रीक्षा उभी दिसली. त्यांनी ती कोणाची आहे, अशी चौकशी केली. त्या वेळी एक युवक समोर आला. कुठे चालवता, किती मोबदला मिळतो वगैरे चौकशी केली. आणि मला चालवायची जरा चावी देता का, असे म्हणून आमदार पवार यांनी विचारणा केली. क्षणभर तो युवक गडबडला. काय उत्तर द्यावे, हे त्याला सुचेना. अखेर त्याने चावी आमदार पवार यांच्याकडे दिली. या वेळी उपस्थित सर्वजण काय करतात, याकडे मोठ्या कुतूहलाने पाहत होते. रोहित पवार यांनी सेल्फ मारला आणि अगदी सराईत आणि निष्णात चालकाप्रमाणे बराच वेळ रिक्षा चालविण्याचा आनंद घेतला. हे पाहून उपस्थितांनी अवाक होण्याबरोबरच तोंडात बोटे घातली.या वेळी रस्त्याच्या दुतर्फा पुरुषसंह महिलांनी मोठी गर्दी केली  होती.

सेल्फीने लावलेय युवकांना वेड

कर्जत- जामखेड मतदारसंघात आमदार रोहित पवार आणि त्यांच्या भोवती पडणारा युवकांचा गराडा, विविध पोझ देत काढलेली सेल्फी असो किंवा केश कर्तनालयात जाऊन केलेली कटिंग, तसेच रेशन धान्य तपासणीसाठी गेल्यानंतर तपासणी झाल्यावर त्याच दुकानदारांच्या कुटुंबातील सदस्याबरोबर खाल्लेली पालकाची भाजी, ठेचा, बेसन आणि भाकरी असो, या सर्व केलेल्या कृतीतून युवकांना आकर्षित करण्यात रोहित पवार यशस्वी ठरले आहेत. त्यांच्यासोबत सेल्फी काढण्यासाठी तर युवकांची झुंबडच उडले.  
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख