आघाडीत बघाडी ! शिवसेना नेत्याविना आखली निवडणुकीची रणनिती - Look at the lead! Election strategy without Shiv Sena leader | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

दहावी व बारावीच्या परीक्षा पुढे ढकलल्या : शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांची घोषणा. याशिवाय सीबीएसई, आयसीएसई आदी बोर्डांनीही त्या पुढे ढकलाव्यात अशी राज्य सरकारची सूचना
Breaking - दहावी-बारावीच्या परिक्षा पुढे ढकलल्या

आघाडीत बघाडी ! शिवसेना नेत्याविना आखली निवडणुकीची रणनिती

शांताराम काळे
शुक्रवार, 13 नोव्हेंबर 2020

निमंत्रणच नसल्याने शिवसेनेचे नेते नाराज असून, प्रसंगी स्वतंत्रपणे निवडणूक लढवू, असा पवित्रा काही नेत्यांनी घेतल्याचे समजते.

अकोले : अकोले नगरपंचायत व अगस्ती कारखान्याच्या निवडणुकीची रणनीती आखण्यासाठी अकोलेतील शासकीय विश्रामगृहावर सर्वपक्षीय नेत्यांची एक बैठक पार पडली. मात्र या बैठकीला सत्तारूढ शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनाच आमंत्रण न दिल्याने अकोले तालुक्यातील आघाडीत बिघाडी झाली असल्याची चर्चा सुरू आहे.

निमंत्रणच नसल्याने शिवसेनेचे नेते नाराज असून, प्रसंगी स्वतंत्रपणे निवडणूक लढवू, असा पवित्रा काही नेत्यांनी घेतल्याचे समजते.

सध्या अकोले तालुक्यात नगरपंचायत व अगस्ती कारखान्याच्या निवडणुकीचे वारे जोरदार वाहू लागले आहेत. त्यामुळे प्रत्येकाच्या तोंडावर या निवडणुकांची चर्चा रंगत आहे. या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आज अकोले येथील शासकीय विश्रामगृहावर नियोजन बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीस राष्ट्रवादी पक्षाचे आमदार डॉ. किरण लहामटे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे दशरथ सावंत, राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते अशोकराव भांगरे, युवानेते अमितदादा भांगरे, माकपचे डॉ. अजित नवले, सुरेश खांडगे, काँग्रेसचे सोन्याबापू वाकचौरे, अगस्तीचे माजी संचालक बाळासाहेब नाईकवाडी आदी प्रमुख नेते उपस्थित होते.

या बैठकीला शिवसेना पक्षातील पदाधिकाऱ्यांनाच आमंत्रण नसल्याने ते या बैठकीला गैरहजर राहिले. या बैठकीत नगर पंचायत व कारखाना निवडणुकीबाबत रणनीती देखील आखण्यात आली. मात्र शिवसेनेच्या एकाही पदाधिकऱ्याला आमंत्रण नसल्याने ही बैठक अधिक चर्चेची ठरली.

दरम्यान, अकोले तालुक्यात भाजपनेत्यांना रोखण्यासाठी इतर पक्षातील नेत्यांनी एकत्र येण्याची गरज असताना राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या नेत्यांनी शिवसेनेला बाजुला ठेवले. अगस्ती कारखाना व नगर पंचायतीच्या निवडणुकीत राज्यात महाविकास आघाडी सरकारमधील पक्षांनी एकत्र यावे, अशी अपेक्षा कार्यकर्त्यांची असताना नेते मात्र एकमेकांपासून दूर होताना दिसत आहेत. त्याचा फायदा भाजपला होईल, असे कार्यकर्त्यांचे मत आहे. या दोन्ही निवडणुकीत आगामी काळात कोण बाजी मारणार, याकडे आता राजकीय धुरिणांचे लक्ष लागले आहे. अकोले तालुक्यातील बहुतेक संस्था भाजपच्या ताब्यात आहेत. त्यामुळे या दोन्हीही निवडणुकांकडे अकोले तालुक्याचे लक्ष लागले आहे.

आमदारांनी बैठकिचे निमंत्रण दिलेच नाही

शासकीय विश्रामगृहावर आयोजित केलेल्या बैठकीचे शिवसेनेला आमंत्रण नव्हते. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आहे. त्यामुळे शिवसेना हा सत्तारूढ पक्ष असल्यामुळे अकोले तालुक्यातील निवडणुकांमध्ये जागांचे समसमान वाटप होणे गरजेचे आहे. अकोले तालुक्यात शिवसेना हा मोठा पक्ष आहे. त्यामुळे राष्ट्रवादीच्या आमदारांनी आम्हाला बैठकांचे आमंत्रण देणे गरजेचे आहे. अन्यथा आम्हाला ही स्वबळाची तयारी ठेवावी लागेल, अशी प्रतक्रिया शिवसेनेचे तालुकाप्रमुख मच्छिंद्र धुमाळ यांनी दिली.

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख