थोडासा दिलासा ! नगरमध्ये आठवड्यात दोनदा कोरोना रुग्णवाढ 500 पर्यंत - A little comfort! Twice a week corona outbreaks in the city up to 500 | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

सातारा : कोयना परिसर भूकंपाच्या धक्क्याने हादरला. भुकंपाची साखळी वेळ-3.22 रिश्टर स्केल-3.00, वेळ-3.44 रिश्टर स्केल-2.8.

थोडासा दिलासा ! नगरमध्ये आठवड्यात दोनदा कोरोना रुग्णवाढ 500 पर्यंत

मुरलीधर कराळे
सोमवार, 28 सप्टेंबर 2020

जिल्ह्यात कालपर्यंत 684 रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला असून, एकूण 41 हजार 959 रुग्णसंख्या झाली आहे.

नगर : गेल्या महिनाभरापासून जिल्ह्यात कोरोना रुग्णसंख्येत 800 पेक्षा जास्तने वाढ होत होती. तथापि, मागील आठवड्यात दोनदा ही रुग्णसंख्या 500 पर्यंत खाली आली आहे. त्यामुळे रुग्णसंख्या हळूहळू कमी होऊ लागल्याचे दिसून येत आहे. काल 553 रुग्ण वाढले आहेत.

जिल्ह्यात कालपर्यंत 684 रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला असून, एकूण 41 हजार 959 रुग्णसंख्या झाली आहे.

जिल्ह्यात काल ५१८ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ३६ हजार ६७५ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ८७.४१ टक्के इतके झाले आहे. काल रूग्णसंख्येत ५५३ ने वाढ झाली. यामुळे उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता ४ हजार ६०० इतकी झाली आहे.

जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅबमध्ये १०३, खासगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत १७६ आणि अँटीजेन चाचणीत २७४ रुग्ण बाधीत आढळले. जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅबमध्ये बाधीत आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा ४७,
अकोले ३, जामखेड २, कर्जत १, नगर ग्रामीण ९, नेवासा १, पाथर्डी ३, राहुरी २, संगमनेर १, श्रीगोंदा ११, श्रीरामपूर ६, मिलिटरी हॉस्पिटल १४ आणि इतर जिल्हा ३  अशा रुग्णांचा समावेश आहे.

खासगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या १७६ रुग्णांची नोंद एकूण रुग्ण संख्येत घेण्यात आली. यामध्ये, मनपा ५२, अकोले १, जामखेड ४, कर्जत ४, कोपरगाव ५, नगर ग्रामीण १७, नेवासा १५, पारनेर ११, पाथर्डी ३, राहाता १२, राहुरी १३, संगमनेर ५, शेवगाव ४, श्रीगोंदा ५, श्रीरामपूर २३ आणि कॅन्टोन्मेंट २ अशा रुग्णांचा समावेश आहे.

अँटीजेन चाचणीत आज २७४ जण बाधित आढळून आले. यामध्ये, मनपा २३, अकोले २८, जामखेड १७, कर्जत २८, कोपरगाव २०, नगर ग्रामीण २०, नेवासा १५, पारनेर ४, पाथर्डी २२, राहाता २१, राहुरी २, संगमनेर ३८, शेवगाव २०, श्रीगोंदा १६ अशा रुग्णांचा समावेश आहे.

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख