त्या पत्रामुळे काॅंग्रेस नेत्यांची लाचारी उघड ! विखे पाटील यांची खोचक टीका - That letter exposed the helplessness of the Congress leaders! Vikhe Patil's sharp criticism | Politics Marathi News - Sarkarnama

त्या पत्रामुळे काॅंग्रेस नेत्यांची लाचारी उघड ! विखे पाटील यांची खोचक टीका

मुरलीधर कराळे
शनिवार, 19 डिसेंबर 2020

महाविकास आघाडी सरकारमधील घटक पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षांनी मुख्यमंत्र्यांना किमान समान कार्यक्रमाच्या अंमलबजावणीबाबत दिलेल्या पत्राबाबत आमदार विखे पाटील यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली.

नगर : राज्यातील काॅंग्रेस नेत्यांनी केंद्रीय नेतृत्वाची दिशाभूल करुन सत्‍तेसाठी लाचारी पत्करल्याचेच आता समोर आले असल्याची खोचक टीका भाजपाचे जेष्ठ नेते आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली.

महाविकास आघाडी सरकारमधील घटक पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षांनी मुख्यमंत्र्यांना किमान समान कार्यक्रमाच्या अंमलबजावणीबाबत दिलेल्या पत्राबाबत आमदार विखे पाटील यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली.

विखे पाटील म्हणाले, की एक वर्षाच्‍या कार्यकाळात या सरकारने फक्‍त घोषणा केल्‍या. खोटी आश्‍वासने दिली, त्‍यामुळे महाविकास आघाडी सरकारच्‍या किमान समान कार्यक्रमाची राज्‍यात कुठेही अंमलबजावणी झाल्‍याचे पाहायला मिळाले नाही. आघाडीत सहभागी असलेल्‍या कॉग्रेस पक्षाच्‍या केंद्रीय नेतृत्‍वाला राज्‍याच्‍या मुख्‍यमंत्र्यांना पत्र पाठवून याबाबतची व्‍यक्‍त करावी लागलेली खंत पुरेशी बोलकी आहे, भविष्‍यात याचे पडसाद उमटल्‍याशिवाय राहणार नाहीत.

राज्यातील जनतेला महाविकास आघाडी सरकारचा फक्त सता वाटपाचा कार्यक्रम पाहिला. यांचा समान कार्यक्रम कुठे दिसलाच नाही, हेच काँग्रेस पक्षाच्या केंद्रीय नेतृत्वाने दिलेल्या पत्रावरून उघड झाले आहे.

ग्रामपंचायत निवडणुकीतून ते दिसेलच

ग्रामपंचायत निवडणुकीत या सरकारचा भांडाफोड होणार आहे. पक्षीय स्‍तरावर या निवडणुका होत नसल्‍या, तरी गावपातळीवर कार्यकर्ते या निवडणूकीत सक्रीयतेने सहभागी होतील. संकटात सापडलेल्‍या शेतकऱ्यांना महाविकास आघाडी सरकारकडुन न मिळालेली मदत आणि कोरोनाच्या संकटात राज्‍यातील जनतेचे झालेले हाल लक्षात घेता महाविकास आघाडी सरकारच्‍या विरोधातील प्रतिक्रीया या निवडणूकीतून राज्‍यात व्‍यक्‍त होईल, असे विखे पाटील म्हणाले.

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख