राज्यावरील कोरोनाचे संकट हटू दे : मिलिंद नार्वेकरांचे शनिदेवाला साकडे - Let go of the corona crisis in the state: Milind Narvekar | Politics Marathi News - Sarkarnama

राज्यावरील कोरोनाचे संकट हटू दे : मिलिंद नार्वेकरांचे शनिदेवाला साकडे

विनायक दरंदले
शनिवार, 2 जानेवारी 2021

"राज्यावर आलेले कोरोनाचे संकट लवकर हटू दे,' अशी प्रार्थना करीत आज शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर यांनी शनिदेवाची पूजा केली.

सोनई  : "राज्यावर आलेले कोरोनाचे संकट लवकर हटू दे,' अशी प्रार्थना करीत आज शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर यांनी शनिदेवाची पूजा केली. आज सायंकाळी स्वयंभू शनिमूर्तीचा अभिषेक, महापूजा व आरती सोहळा झाला. 

उदासी महाराज मठात नार्वेकर यांच्या हस्ते सपत्निक शांतीपाठ, संकल्प, गणेशपूजन, आवाहन करुन स्वयंभू शनिमूर्तीला जलस्नान, पंचामृतस्नान, तैलाभिषेक व महानैवद्य अर्पण करून आरती सोहळा करण्यात आला. पुरोहित अशोक कुलकर्णी व डिगंबर जोशी यांनी पौरहित्य केले. उपस्थित भाविकांना या वेळी प्रसाद वाटप करण्यात आला. 

शनैश्वर देवस्थान ट्रस्टच्यावतीने विश्वस्त अप्पासाहेब शेटे यांनी नार्वेकर यांचा सत्कार केला. या वेळी राजेंद्र गुगळे, विश्वस्त भागवत बानकर, माजी विश्वस्त योगेश बानकर उपस्थित होते. जनसंपर्क अधिकारी अनिल दरंदले यांनी देवस्थानच्या उपक्रमाची माहिती दिली. 

 

हेही वाचा..

शिर्डीत रोटरीतर्फे लवकरच डायलेसीस केंद्र : प्राचार्य डांगे 

शिर्डी : शिर्डी रोटरीच्यावतीने गरजू रुग्णांसाठी लवकरच डायलेसीस केंद्र सुरू केले जाणार आहे. गरजुंना अल्पदरात सेवा देणाऱ्या सेवाभावी रुग्णालयांना वैद्यकीय साहित्याची देणगी देण्याचे रोटरीचे धोरण आहे, असे प्रतिपादन रोटरीचे अध्यक्ष प्राचार्य ज्ञानेश डांगे यांनी केले. 

शिर्डी रोटरी क्‍लबच्यावतीने कोपरगाव येथील संत जनार्दनस्वामी सेवाभावी रुग्णालयास ऑक्‍सिजन मशिन भेट देण्यात आले. यानिमित्ताने आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. रुग्णालयाचे व्यवस्थापक प्रसाद कातकडे, रोटरीचे पदाधिकारी डॉ. एम. वाय. देशमुख, डॉ. पी. जी. गुंजाळ, अभियंता शरद निमसे, माजिद पठाण, राजेंद्र कोते, निखिल बोरावके, आकाश सोनार, रविकिरण डाके, गफ्फार पठाण, नानासाहेब बोठे आदी या वेळी उपस्थित होते. 

प्राचार्य डांगे म्हणाले, की शिर्डी येथील डॉ. देशमुख रुग्णालयात डायलेसीस सेंटर सुरू करण्यात येत आहे. त्यांचा गरजुंना मोठा लाभ होईल. कोविडचा प्रकोप सुरू असताना नगर जिल्ह्यात रोटरीच्यावतीने एक कोविड उपचार केंद्र सुरू करण्यात आले. कोविड लसिकरणाच्या खर्चासाठी निधी संकलन करून तो केंद्रसरकारकडे सुपूर्त केला जाईल. त्यासाठी रोटरीचे देशव्यापी अभियान सुरू आहे. 
अभय दुनाखे यांनी प्रास्ताविक केले. उद्योजक राजेंद्र कोते यांनी रोटरीच्या विविध उपक्रमांची माहिती दिली. 
 

Edited By - Murllidhar Karale

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख