पाहणी, पंचनामे सोडा, अतिवृष्टीने नुकसानग्रस्तांना सरसकट मदत द्या - Leave inspections, panchnama, give all possible help to those affected by heavy rains | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

कोरोना इफेक्ट : राज्य माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात येणाऱ्या दहावीच्या परीक्षा रद्द
सातारा : कोयना परिसर भूकंपाच्या धक्क्याने हादरला. भुकंपाची साखळी वेळ-3.22 रिश्टर स्केल-3.00, वेळ-3.44 रिश्टर स्केल-2.8.

पाहणी, पंचनामे सोडा, अतिवृष्टीने नुकसानग्रस्तांना सरसकट मदत द्या

मुरलीधर कराळे
बुधवार, 21 ऑक्टोबर 2020

अतिवृष्टी, महापूर हे संकट जिल्ह्यात शेतकऱ्यांवर आले आहे. त्यातून सावरण्यासाठी शेतकऱ्यांना मदतीची गरज आहे.

नगर : जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे शेतकरी हैराण झाले आहेत. मोठा खर्च करून पिकविलेल्या कांदा पिकाचे नुकसान शेतकऱ्यांना डोळ्यात पाणी आणणारे ठरले आहे. उद्धस्त झालेल्या शेतकऱ्यांचे पंचनामे, पाहणी दाैरे करीत बसण्यापेक्षा महाविकास आघाडी सरकारने सरकट मदत जाहीर करावी, अशी मागणी जिल्हा परिषदेचे सदस्य राजेश परजणे यांनी केली आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिलेल्या निवेदनात त्यांनी नुकसानग्रस्त भागाची माहिती दिली आहे. अतिवृष्टी, महापूर हे संकट जिल्ह्यात शेतकऱ्यांवर आले आहे. त्यातून सावरण्यासाठी शेतकऱ्यांना मदतीची गरज आहे. सोयाबीन, ऊस, कापूस, बाजरी, उडीद,तूर, मूग, कांदा, बटाटा, भात, ऊस तसेच फळबागांचे मोठे नुकसान जिल्ह्यात झाले आहे. 

सरकारने पंचनामे किंवा पाहणी करण्यापेक्षा थेट सर्व शेतकऱ्यांना अनुदान द्यावे, अशी मागणी परजणे यांनी केली आहे. याबाबतचे निवेदन मुख्यमंत्री ठाकरे तसेच महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना पाठविण्यात आले आहे.

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख