नगरमध्ये कोरोना संसर्ग रोखण्यासाठी प्रसिद्धी अभियानाचा प्रारंभ - Launch of publicity campaign to prevent corona infection | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

मुंबईतील शेतकरी मोर्चा मेट्रो सिनेमाजवळ अडवला.... राजभवनवर जाण्यासाठी केवळ 20 जणांच्या शिष्टमंडळाला मंजूरी
मुंबईतील शेतकरी मोर्चा मेट्रो सिनेमाजवळ अडवला.... राजभवनवर जाण्यासाठी केवळ 20 जणांच्या शिष्टमंडळाला मंजूरी
सरपंचपदाचे आरक्षण नव्यानेच होणार आणि प्रशासकांच्या कारभाराची चौकशीही होणार

नगरमध्ये कोरोना संसर्ग रोखण्यासाठी प्रसिद्धी अभियानाचा प्रारंभ

मुरलीधर कराळे
सोमवार, 10 ऑगस्ट 2020

या फिरत्या प्रसिद्धी वाहनाच्या माध्यमातून कोरोना संसर्ग रोखण्यासाठी नागरिकांनी घ्यावयाची काळजी, प्रतिबंधात्मक उपाययोजना आदींची माहिती पोहोचवली जाणार आहे.

नगर : जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासकीय पातळीवर विविध प्रयत्न होत आहेत. त्याचाच भाग म्हणून कोरोना संसर्ग होऊ नये, यासाठी प्रबोधन केले जात आहे. आज या प्रसिद्धीच्या विशेष अभियानाचा प्रारंभ नगर शहरातून करण्यात आला.

केंद्र सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्‍या नगर येथील क्षेत्रीय लोकसंपर्क विभागाद्वारे आयोजित कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी जनजागृती, प्रधानमंत्री गरीब कल्‍याण योजना आणि आत्‍मनिर्भर भारत या योजनांवर आ‍धारित फिरत्या वाहनाद्वारे प्रसिद्धी अभियानाचा प्रारंभ आज जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयापासून करण्यात आला.

या फिरत्या प्रसिद्धी वाहनाच्या माध्यमातून कोरोना संसर्ग रोखण्यासाठी नागरिकांनी घ्यावयाची काळजी, प्रतिबंधात्मक उपाययोजना आदींची माहिती पोहोचवली जाणार आहे. याशिवाय कोरोना प्रादुर्भावाच्या या काळात केंद्र सरकारद्वारे जाहीर करण्‍यात आलेल्‍या प्रधानमंत्री गरीब कल्‍याण योजना तसेच आत्‍मनिर्भर भारत अभियानाची माहिती ध्‍वनीफित तसेच चित्रस्‍वरुपात देण्‍यात येणार आहे. हे फिरते वाहन आजपासून 14 दिवस नगर शहर आणि आजुबाजूच्‍या परिसरात प्रचार आणि प्रसार करणार आहे.

राज्‍यातील काही जिल्‍ह्यात या अभियानाचा प्रारंभ करण्‍यात आला असून, क्षेत्रीय लोकसंपर्क कार्यालयांद्वारे केंद्र सरकारच्‍या विविध योजना व घेतलेल्‍या लोकाभिमुख निर्णयाची माहिती गावागावात जाऊन देण्‍यात येते. जेणेकरुन सरकारच्‍या योजनांचा लाभ तळागाळातील जनतेला मिळावा, हा या कार्यालयाचा मुळ उद्देश असल्‍याचे क्षेत्रीय प्रचार अधिकारी माधव जायभाये यांनी सांगितले.

दरम्यान, कोरोनाला घाबरून चालणार नाही, तर त्याच्याशी सामना करावा लागेल, यासाठी लोकांमध्ये प्रबोधन होेणे आवश्यक आहे. प्रशासनाच्या वतीने विविध ठिकाणी कोविड सेंटर उभारले आहेत. त्यामुळे लोकांना चांगल्या सुविधा मिळत आहे. या शिवाय वेबसाईटच्या माध्यमातून रोज कोविड सेंटरवरील रिक्त बेडची माहिती दिली जात आहे. आजपासून प्रचार व प्रसिद्धी करण्यासाठी विशेष वाहन शहरात फिरणार आहे.

 

 

 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख