पारनेरच्या `त्या` तहसीलदार ठरताहेत `लेडी सिंघम` - Lady Singham is the tehsildar of Parner | Politics Marathi News - Sarkarnama

पारनेरच्या `त्या` तहसीलदार ठरताहेत `लेडी सिंघम`

मार्तंड बुचुडे
शनिवार, 19 सप्टेंबर 2020

सहसा कोणाच्याही दबावाला बळी न पडणाऱ्या देवरे अशी त्यांची ख्याती आता तालुक्यात तयार झाली आहे.

पारनेर : तहसीलदार ज्योती देवरे ह्या पारनेरच्या तहसीलदारपदी हजर झाल्या अन तेव्हा पासूनच त्यांनी अनेक धडाकेबाज कारवाया केल्या. मात्र सहसा कोणाच्याही दबावाला बळी न पडणाऱ्या देवरे अशी त्यांची ख्याती आता तालुक्यात तयार झाली आहे. त्यांच्या धडक कारवाया आणि राजकारण्यांनाही न घाबरता घेत असलेल्या भुमिकांमुळे त्यांना लोक आता `लेडी सिंघम` म्हणून लागले आहेत.

दोन दिवसांपुर्वी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुजीत झावरे यांच्यावरील दाखल केलेल्या गुन्ह्याची कारवाई असो किंवा निवडणूक काळात आमदार निलेश लंके यांच्या मोहाटादेवी दर्शनासाठी केलेल्या महिलांसाठीच्या मोफत गाड्यांवरील कारवाई असो, त्यांनी अनेकदा कठोर भूमिका घेतली आहे.

देवरे यांची आता पर्यंतची धडक कारवाई सातत्याने धडाकेबाज ठरली आहे. काही वेळा केलेल्या कारवाईचे पडसाद वादग्रस्तही ऊमटले आहेत, मात्र त्या आपल्या निर्णयावर ठाम राहिल्या आहेत. त्यामुळे बहुतेक वेळा त्यांच्या कारवाईस तालुक्यतील जनतेने मात्र पाठिंबा देत त्यांची वाहावाच केली आहे.

यापूर्वी वाळू तस्करांवर कारवाई असो, की राजकीय व्यक्तीवरील कारवाई असो. त्यांनी अनेकदा महसूल कर्मचाऱ्यांना सुद्धा धारेवर धरले आहे. इतकेच नव्हे, तर त्यांच्यावर सुद्धा गुन्हे दाखल करण्यासही त्यांनी मागेपुढे पाहिले नाही.

त्या तालुक्यात आल्यानंतर अनेकदा वाळू तस्कारांवर कारवाई करताना अनेक समस्या आल्या. नुकतेच टाकळी ढोकेश्वर येथे वाळूच्या गाडीला अडविताना त्या वाळू तस्कारंनी त्यांच्या अंगावर वाळुची गाडी घालण्याचा ही प्रयत्न केला होता. तसेच काही दिवसांपूर्वी निघोज येथे त्याच्या अंगावर डिझेल टाकून त्यांना पेटविण्याचाही प्रयत्न झाला होता. अशा धडाकेबाज कारवायांमुळे वाळू तस्कारांवरही त्यांची जबरदस्त दहशत आहे.

निवडणूक काळात प्राचाराच्या गाड्यावरील कारवाया सुद्धा त्या काळात अनेकदा वादग्रस्त ठरल्या होत्या. त्यांनी त्या काळात आमदार लंके यांच्याविरोधात सुद्धा अनेकदा कठोर भूमिका घेतली होती. कोरोनाच्या काळात लॉकडाऊन झाल्यानंतर परप्रांतिय मजुरांना देण्यात येत असलेल्या लंके यांच्या मोठ मोठ्या जेवणावळीवरही त्यांनी अक्षेप घेतला होता. त्यातूनही अनेकदा लंके यांचे कार्यकर्ते व देवरे यांच्यात वाद झाले होते.

गेल्या सहा महिन्यांपासून तालुक्यात सुरू असलेल्या कोरोनाविरोधाच्या लढाईत तालुक्याला कोरोनापासून अनेक दिवस त्यांनी कोरोनामुक्त ठेवले होते. वेळप्रसंगी त्यांनी स्वतः काठी घेतली व ती उगारली सुद्धा. ही त्यांची कृती अनेकदा वादग्रस्त ठरली. कोरोनाच्या काळात त्या जनतेच्या गळ्यातील ताईत बनल्या आहेत. स्वतः पॉझिटिव्ह असतानाही त्यांनी आपले काम सुरू ठेवले होते. कोरोना काळात समाज प्रबेधनासाठी अनेक गीते तयार करून त्याचे व्हिडिओ आले ते राज्यभरात गाजले. अनेकांनी त्यांच्या या व्हिडिओची वाहवाही केली.

एखाद्या गावात कोरोना रूग्ण् सापडला, तर तेथे रात्री अपरात्री जाऊन तो भाग बंद करणे, रूग्णाची रूग्णालयात रवाणगी करणे, त्या परिसरातील व गावातील लोकांचे ध्वनीक्षेपकावरून प्रबोधऩ करणे, आदी कामे त्यांनी मोठ्या हिमतीने केली आहेत. कोणत्याही परिस्थितीत त्या थांबल्या नाहीत.

अनेकदा समन्वयाची भूमिका घेणाऱ्या दवेरे ह्या कधी कधी मात्र ताठर भूमिका घेतात, अशी त्यांची कारकीर्द सध्या सुरू आहे, मात्र बहुतेक वेळा त्याच्या या कामांना व कारवाईस जनेतेचा मात्र त्यांना पाठिंबा मिळत आहे.

Edited By - Murlidhar Karale
    
 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख