कोविड सेंटरवर प्रा. राम शिंदे यांनी या केल्या सूचना - Kovid Center These suggestions were made by Ram Shinde | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

शरद पवार म्हणतात, "मला वाटतं मुख्यमंत्री व्हावं, कुणी करणार का.."
धनंजय मुंडे यांच्यावरील बलात्काराची तक्रार मागे

कोविड सेंटरवर प्रा. राम शिंदे यांनी या केल्या सूचना

निलेश दिवटे
सोमवार, 31 ऑगस्ट 2020

माजी मंत्री शिंदे यांनी दादा पाटील महाविद्यालयातील कोरोना सेंटरला अचानक भेट दिली. येथे क्वारंटाईन असलेल्या रूग्णांशी येथे मिळत असलेल्या सुविधाबाबत चर्चा केली.

कर्जत : राज्याचे माजी मंत्री प्रा. राम शिंदे यांनी अचानकपणे येथील कोव्हिड सेंटरला भेट दिली व येथे उपचार घेत असलेल्यांची आरोग्यसेवा व मिळत असलेल्या सुविधाबाबत आस्थेवाईकपणे चौकशी केली. या नंतर  येथे दिल्या जात असलेल्या सुविधाबाबत त्यांनी मार्गदर्शक सूचना करीत समाधान व्यक्त केले.

या वेळी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संदीप पुंड, वैद्यकीय अधिकारी प्रेरणा पाटील, परिचारिक ठोसर आदी उपस्थित होते. गेल्या सहा महिन्यांपासून कोरोनाने सर्वत्र थैमान घातले आहे. त्याला तालुका अपवाद नाही. सध्या तालुक्यातील कोरोनाबाधित 70 रुग्ण क्वारंटाईन सेंटरमध्ये उपचार घेत आहेत. 

माजी मंत्री शिंदे यांनी दादा पाटील महाविद्यालयातील कोरोना सेंटरला अचानक भेट दिली. येथे क्वारंटाईन असलेल्या रूग्णांशी येथे मिळत असलेल्या सुविधाबाबत चर्चा केली.

आम्हाला चांगल्या प्रकारची आरोग्य सेवा मिळते, तसेच सुविधाही चांगल्या आहेत, असे तेथील रुग्णांनी सांगितले. या वेळी तालुक्यातील 2 हजार 85 संशयितांची आता पर्यन्त तपासणी करण्यात आली असून, यापैकी 547 रूग्ण पाॅझिटिव्ह आढळले आहेत. 430 जणांनी कोरोनावर मात केली आहे. मात्र या महामारीत दुर्दैवाने 14 जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या एकूण 74 रूग्ण या क्वारंटाईन सेंटरमध्ये आहेत. हे सर्व जण ठिक आहेत, अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संदीप पुंड यांनी या वेळी दिली.

यावर राम शिंदे यांनी समाधान व्यक्त केले. तसेच आरोग्य विभागाचे अधिकारी व कर्मचारी यांनी स्वतः ची काळजी घ्यावी, असे आवाहन केले. कोरोना हे जागतिक महामारीचे संकट आहे. याचा सर्वांनी धीराने सामना करा. यावर  विनामस्क फिरणे टाळा, फक्त अत्यावश्यक कामासाठीच बाहेर पडावे, सानिटायझरचा वापर करीत सोशल डिस्टन्स पाळा, तसेच आरोग्य विभागाने दिलेल्या सूचनांचे पालन करणे गरजेचे आहे. सध्यातरी हाच एकमेव उपाय आहे, अशा सूचना या  वेळी शिंदे यांनी दिल्या.

Edited By - Murlidhar Karale

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख