नगर : कापड व्यवसायात नगरची ओळख बनलेल्या कोहिनूर वस्त्रदालनाचे संचालक प्रदीप वसंतलाल गांधी (वय 65) यांचे आज निधन झाले. याच दालनात यापूर्वी काही कर्मचारी कोरोनाबाधित आढळले होते. त्यानंतर बाजारपेठ बंद ठेवण्याची वेळ आली होती. त्याच वेळी कोहिनूर चर्चेत आले होते.
कोहिनूर हे वस्त्रदालन नगर जिल्ह्यात सर्वात मोठे समजले जाते. या दालनाच्या माध्यमातून व्यवसायाबरोबरच सामाजिक बांधिलकीही जोपासली जाते. गांधी यांनी समाजात आपले वेगळे स्थान निर्माण केले होते. गरजुवंतांना मदत, शासनाच्या प्रत्येक मदतीच्या हाकेला धावून जात ते मदत करीत असत.
गेल्या चार दिवसांपासून गांधी यांच्यावर शहरातील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरु होते. आज दुपारी त्यांचे निधन झाले. गांधी यांच्या मागे एक मुलगा, एक मुलगी असा परिवार आहे.
Edited By - Murlidhar Karale

