टाकळी ढोकेश्वर (नगर) : तुम्ही, आम्ही सर्व शेतकऱ्यांचे पोरं आहोत. आमच्या आई- वडीलांनी देखील भाजीपाला विकला आहे. त्यांच्या व्यथा आम्हाला माहित आहेत, त्यांना धमकावणे, मारहाण करणे योग्य नाही, अन्यथा गाठ माझ्याशी आहे, असा दम आमदार निलेश लंके यांनी पोलिसांना दिला भरला.
टाकळी ढोकेश्वर (ता. पारनेर) येथे भाजीपाला विक्रीसाठी अनेक शेतकरी येतात, कोरोना आजाराच्या पार्श्वभूमीवर लाॅकडाऊनमुळे ठराविक वेळ ही त्यांना भाजीपाला विक्रीसाठी दिलेली आहे, मात्र थोडा उशीरा झाल्याने त्यांना तेथील पोलिसांनी धमकावून मारहाण करून त्यांचे वजन काटे जप्त केले व गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली. ही माहीती शेतकऱ्यांनी आमदार लंके यांना दिल्यानंतर लंके यांनी तात्काळ तिथे जात पोलिसांना चांगलेच धारेवर धरले. त्यावेळी मात्र पोलसांची चांगलीच तांरबळ उडाली. या घटनेचा व्हीडिओच सोशल मेडीयावर चांगलाचा व्हायरल झाला आहे.
या वेळी आमदार लंके म्हणाले, की मोठ्या लोकांची पोरं कोणी पोलीस होत नाहीत. शेतकऱ्यांचे पोर होतात. तुम्ही आणि मी शेतकरी कुटुंबातुनच पुढे आलो आहोत. त्यामुळे गरीबांना त्रास देणे बंद करा. बाजारपेठेतील दुकाने अर्धे दरावाजे उघडे ठेवुन सुरू असतात, तिथे आपण जात नाहीत, मात्र गरीबांना धमकवाता, मारहाण करता, हे बरोबर नाही, हे बंद करा, नाहीतर मला तुमचे दुसरे उद्योग बाहेर काढावे लागतील, हे लक्षात ठेवा, असा इशारा लंके यांनी दिला.
टाकळी ढोकेश्वर पोलीस चौकीचे शुध्दीकरण होणे गरजेचे आहे, आपल्याबद्दल अनेक तक्रारी आल्या आहेत, याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली.
दरम्यान, टाकळी ढोकेश्वर परिसरात कोरोनाचे रुग्ण वाढू न देण्यासाठी प्रशासकीय पातळीवर विशेष प्रयत्न होत आहे. पोलिसांकडून सर्वसामान्य लोकांना त्रास होऊ नये म्हणून आमदार लंके यांचे प्रयत्न आहेत. शेतकऱ्यांनी तक्रार करताच लंके स्वतः तेथे हजर झाले. शेतकऱ्यांचे पोलिसांनी घेतलेले काटे परत देण्याचे नियोजन केले. तसेच शेतकऱ्यांनाही काळजी घेण्याचे आवाहन केले.
Edited By - Murlidhar Karale

