आदिवासींसाठी खावटी योजना सुरू ! पिचड यांच्या पाठपुराव्याला यश - Khawati scheme for tribals launched! Pitched's pursuit of success | Politics Marathi News - Sarkarnama

आदिवासींसाठी खावटी योजना सुरू ! पिचड यांच्या पाठपुराव्याला यश

शांताराम काळे
गुरुवार, 10 सप्टेंबर 2020

राज्यात उदभवलेल्या कोरोना विषाणुच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर अनुसूचित जमातीच्या कुटुंबियांना सहाय्य करण्यसाठी खावटी अनुदान योजना एक वर्षासाठी सुरु करण्यात आली आहे.

अकोले : राज्यात उदभवलेल्या कोरोना विषाणुच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर अनुसूचित जमातीच्या कुटुंबियांना सहाय्य करण्यसाठी खावटी अनुदान योजना एक वर्षासाठी सुरु करण्यात आली आहे. त्याचा शासन निर्णय ९ सप्टेंबर २०२० रोजी काढण्यात आला आहे.

ता. २८ जून २०१३ रोजीच्या शासन निर्णयान्वये खावटी कर्जाचे वाटप हे शंभर टक्के रोख स्वरुपात करण्यात आलेले होते. सध्याकोविड विषाणुमुळे निर्माण झालेली आपात्कालीन परिस्थितीमध्ये अनुसूचीत जमातीच्या कुटुंबियांना मदत देण्यासाठी शंभर टक्के रोखीने खावटीकर्ज वाटप करण्याच्या निर्णयातून सूट देऊन ही योजना शंभर टक्के अनुदानीत योजना एक वर्षासाठी (सन 2020-21) पुन्हा सुरू करण्यास व या योजनेचा लाभ 5० टक्के रोख व 5० टक्केवस्तु अनुदान स्वरुपात देण्यास मान्यता देण्यात येत आहे.

खावटी अनुदान योजनेंतर्गत अनुसूचित जमातीच्या कुटुंबियांना चार हजार प्रती कुटुंब  अनुदान, ज्यामध्ये दोन हजार रुपये किमतीच्या वस्तू व दोन हजार रोख देण्यात येणार आहेत. खावटी अनुदान योजनेची अंमलबजावणी महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळाच्या मार्फत  करण्यात येईल.

 

याबाबत भाजपचे माजी आमदारवैभव पिचड व राज्यातील आदिवासी संघांनी आवाज उठवून सरकारला पूर्वीचा बदलून नवीन खावटी निर्णय घ्यावा लागला व ९ सप्टेंबर चा आदेश काढून तो 11 लाख ५५ हजार कुटुंबासाठी जाहीर केल्याने पिचड यांनी समाधान व्यक्त केले आहे.

Edited By - Murlidhar Karale

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख