सिंचन घोटाळ्यात खडसे साक्षीदार, तोच फोडण्याचा NCP चा प्रयत्न : प्रा. शिंदे - Khadse witness in Rs 70 crore scam, NCP's attempt to expose him: Pvt. Shinde | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

सातारा : कोयना परिसर भूकंपाच्या धक्क्याने हादरला. भुकंपाची साखळी वेळ-3.22 रिश्टर स्केल-3.00, वेळ-3.44 रिश्टर स्केल-2.8.

सिंचन घोटाळ्यात खडसे साक्षीदार, तोच फोडण्याचा NCP चा प्रयत्न : प्रा. शिंदे

मुरलीधर कराळे
शनिवार, 24 ऑक्टोबर 2020

खडसे यांची साक्ष यापूर्वीच होऊन गेली आहे. त्यामुळे खडसे यांना राष्ट्रवादीत घेतले, तरी राष्ट्रवादीला त्याचा फायदा होणार नाही.

नगर :`` सिंचन घोटाळ्याने राज्याला हादरले. त्या वेळी 70 हजार कोटींचा घोटाळा झाला. त्याची चाैकशी सध्या ईडीकडून सुरू आहे. त्याप्रकरणी तत्कालीन विरोधी पक्षनेते असलेले एकनाथ खडसे प्रमुख साक्षीदार होते. आती ही चाैकशी अंतीम टप्प्यात आहे. खडसे यांना राष्ट्रवादीत देऊन साक्षीदारच फोडण्याचा राष्ट्रवादीचा प्रयत्न आहे,`` असा घणाघाती आरोप माजी मंत्री प्रा. राम शिंदे यांनी केला आहे.

कर्जत येथे काल माध्यमांशी बोलताना ते म्हणाले, की सिंचन घोटाळा थोडा नाही. तब्बल 70 हजार कोटींचा आहे. त्याची चाैकशी सध्या सुरू आहे. त्या वेळी विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे होते. ते मुख्य साक्षीदार आहेत. परंतु खडसे यांची साक्ष यापूर्वीच होऊन गेली आहे. त्यामुळे खडसे यांना राष्ट्रवादीत घेतले, तरी राष्ट्रवादीला त्याचा फायदा होणार नाही, असा टोला प्रा. शिंदे यांनी लगावला.

भरती-ओहोटी नाहीच

खडसे यांना राष्ट्रवादीत प्रवेश केला म्हणून राष्ट्रवादीत भरती, अन भाजपमधून ओहोटी लागली, असे काहीजण म्हणतात. त्यात काहीच तथ्य नाही. भारतीय जनता पक्ष हा सर्वांत मोठा आहे. भाजपकडे सध्या अनेक राज्य आहेत. मुख्यमंत्री आहेत, अनेक खासदार आहेत. त्यामुळे राष्ट्रवादीत भरती वगैरे काहीच नाही. यापूर्वी ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांनी सांगितले होते, की आमच्या संपर्कात अनेकजण आहेत. त्यांनीच सांगावे ते आता गेले कुठे? खडसे यांच्या प्रवेशानंतर एकही आमदार त्यांच्यासोबत गेला नाही. त्यामुळे भाजपमधील कोणीच त्यांना साथ देत पक्षांतर करणार नाही. काहींनी हा गैरसमज दूर करावा, असा टोला त्यांनी लगावला.

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख