केडगाव हत्याकांड ! सुवर्णा कोतकर यांच्या जामीन अर्जावर आज सुनावणी - Kedgaon double murder! Hearing on pre-arrest bail application of Suvarna Kotkar today | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

सातारा : कोयना परिसर भूकंपाच्या धक्क्याने हादरला. भुकंपाची साखळी वेळ-3.22 रिश्टर स्केल-3.00, वेळ-3.44 रिश्टर स्केल-2.8.

केडगाव हत्याकांड ! सुवर्णा कोतकर यांच्या जामीन अर्जावर आज सुनावणी

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 11 डिसेंबर 2020
महापालिका पोटनिवडणुकीच्या निकालानंतर केडगावमध्ये दोन शिवसेना कार्यकर्त्यांची हत्या झाली. या गुन्ह्यामध्ये नगरसेवक सुवर्णा कोतकर यांचे नाव आरोपींच्या यादीत समोर आले होते.

नगर : केडगाव दुहेरी हत्याकांडातील संशयित आरोपी सुवर्णा कोतकर यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर काल जिल्हा सत्र न्यायालयासमोर सुनावणी झाली. आरोपी पक्षातर्फे काल बाजू मांडण्यात आली. शुक्रवारी (ता. 11) सरकार पक्ष बाजू मांडणार असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.

महापालिका पोटनिवडणुकीच्या निकालानंतर केडगावमध्ये दोन शिवसेना कार्यकर्त्यांची हत्या झाली. या गुन्ह्यामध्ये नगरसेवक सुवर्णा कोतकर यांचे नाव आरोपींच्या यादीत समोर आले होते. घटना घडल्यापासून त्या अद्यापपर्यंत पसार होत्या.

दोषारोपत्रामध्ये त्यांना फरार घोषित करण्यात आले होते. त्यांनी अटकपूर्व जामिनासाठी जिल्हा सत्र न्यायालयात अर्ज केला होता. त्यावर आज आरोपी पक्षातर्फे न्यायालयात बाजू मांडण्यात आली.

फिर्यादीमध्ये सुवर्णा कोतकर यांच्या नावाचा उल्लेख नाही. राजकीय हेतूने त्यांच्या नावाचा गुन्ह्यात समावेश करण्यात आला आहे, असा युक्तिवाद ऍड. नितीन गवारे यांनी केला. न्यायालयाने आरोपी पक्षाचे म्हणणे ऐकून घेतले. सरकार पक्ष उद्या बाजू मांडणार असल्याचे सूत्रांकडून समजले.

दरम्यान, महापालिकेच्या निवडणुकीच्या कारणावरून झालेले हे हत्याकांड महाराष्ट्रात गाजले होते. त्यावरून राजकीय पातळीवर मोठ्या घडामोडी झाल्या होत्या. या प्रकरणी अनेक राजकीय नेत्यांनाही अटक झाली होती.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख