कर्जत नगरपंचायत आरक्षण ! रोहित पवार की राम शिंदे यांचे वर्चस्व - Karjat Nagar Panchayat reservation! Dominated by Rohit Pawar or Ram Shinde | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज रात्री ८ :४५ वाजता COVID परिस्थितीवर देशाला संबोधित करतील.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज रात्री ८ :४५ वाजता COVID परिस्थितीवर देशाला संबोधित करतील.
कोरोना इफेक्ट : राज्य माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात येणाऱ्या दहावीच्या परीक्षा रद्द
सातारा : कोयना परिसर भूकंपाच्या धक्क्याने हादरला. भुकंपाची साखळी वेळ-3.22 रिश्टर स्केल-3.00, वेळ-3.44 रिश्टर स्केल-2.8.

कर्जत नगरपंचायत आरक्षण ! रोहित पवार की राम शिंदे यांचे वर्चस्व

निलेश दिवटे
मंगळवार, 10 नोव्हेंबर 2020

काही इच्छुकांना सोयीचे तर काहींच्या अडचणींचे आरक्षण पडल्याने `कही खुशी कही गम` अशी स्थिती उधभवली आहे. येथील आरक्षण काय पडते, या कडे राजकीय धुरीणांचे लक्ष लागले होते.

कर्जत : येथील नगरपंचायतीच्या आगामी निवडणुकीसाठी आज प्रभाग निहाय आरक्षण जाहीर करण्यात आले. यामध्ये विद्यमान नगराध्यक्षा व उपनगराध्यक्ष यांची कोंडी झाली आहे. त्यांना आता नवीन प्रभाग शोधून निवडणूक लढवावी लागणार आहे.

दरम्यान, राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार व भाजपचे माजी मंत्री राम शिंदे यापैकी कोणाच्या ताब्यात ही नगरपंचायत जाते, याकडे महाराष्ट्राचे लक्ष लागणार आहे.

ही इच्छुकांना सोयीचे तर काहींच्या अडचणींचे आरक्षण पडल्याने `कही खुशी कही गम` अशी स्थिती उधभवली आहे. येथील आरक्षण काय पडते, या कडे राजकीय धुरीणांचे लक्ष लागले होते.

या सोडतीला नगरसेवक व इच्छुक उमेदवारांनी मोठी गर्दी केली होती.  कर्जत नगरपंचायतीच्या आगामी निवडणुकीसाठी आज नगरपंचायतीच्या आवारात प्रभाग निहाय आरक्षण सोडत काढुन जाहीर करण्यात आले. निवडणूक निर्णय अधिकारी अर्चना नष्टे, पोलीस निरीक्षक सुनील गायकवाड, मुख्याधिकारी गोविंद जाधव, यांच्यासह नगरपंचायतीचे कर्मचारी उपस्थित होते.

प्रांत अर्चना नष्टे व मुख्याधिकारी जाधव यांनी आरक्षणासंदर्भात उपस्थितांना माहिती दिली. आरक्षणाच्या चिठ्ठ्या लहान मुलांच्या हस्ते काढल्या. आज जाहीर झालेल्या आरक्षणामुळे कर्जत नगरपंचायतीच्या विद्यमान नगराध्यक्षा प्रतिभा भैलुमे व उपनगराध्यक्ष नामदेव राऊत यांचे प्रभाग आरक्षीत झाल्यामुळे त्यांना मोठी अडचण निर्माण झाली आहे.

आगामी निवडणुकीत यांना पर्यायी प्रभागातुन उमेदवारी करावी लागणार आहे. नवीन प्रभाग निहाय पडलेले आरक्षण पुढीलप्रमाणे : प्रभाग -एक - नागरीकांचा मागास प्रवर्ग महिला, प्रभाग दोन - नागरीकांचा मागास प्रवर्ग व्यक्ती, प्रभाग - तीन  - नागरीकांचा मागास प्रवर्ग महिला, प्रभाग - चार- सर्वसाधारण स्त्री, प्रभाग - पाच -  नागरिकांचा मागास प्रवर्ग व्यक्ती, प्रभाग - सहा - सर्वसाधारण व्यक्ती, प्रभाग - सात- सर्वसाधारण व्यक्ती, प्रभाग - आठ - सर्वसाधारण व्यक्ती, प्रभाग - नऊ - सर्वसाधारण महिला, प्रभाग - दहा- सर्वसाधारण महिला, प्रभाग -अकरा - नागरीकांचा मागास प्रवर्ग महिला, प्रभाग - बारा- सर्वसाधारण व्यक्ती, प्रभाग - तेरा - सर्वसाधारण व्यक्ती, प्रभाग - चौदा- सर्वसाधारण महिला, प्रभाग - पंधरा - अनुसूचित जाती पुरूष, प्रभाग - सोळा - अनुसूचित जाती महिला, प्रभाग - सतरा - सर्वसाधारण महिला.

इतर प्रभागातून निवडणूक लढणार

मी गेली पाच वर्षे सर्वसामान्यांना केंद्रस्थानी माणून विकास कामे केली आहेत. मी ज्या प्रभागाचे प्रतिनिधित्व करीत होतो. तो प्रभाग या वेळी आरक्षीत झाला असला, तरी विकास कामे व संपर्काच्या बळावर इतर प्रभागातून लढणार आहे, असे उपनगराध्यक्ष नामदेव राऊत यांनी सांगितले.

Edited By - Murlidhar Karale

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख