`बारामती`चे सुधारीत तंत्र कर्जत-जामखेडकरांना भावले - Karjat-Jamkhedkar felt the improved technique of 'Baramati' | Politics Marathi News - Sarkarnama

`बारामती`चे सुधारीत तंत्र कर्जत-जामखेडकरांना भावले

वसंत सानप
शनिवार, 29 ऑगस्ट 2020

या वेळी राजेंद्र पवार म्हणाले, "पिक नियोजनामध्ये सुधारित वाण, जैविक खते किटनाशके यांचा वापर तसेच शेतकरीचे पिक निहाय गट तयार करावे.

जामखेड : कर्जत- जामखेड तालुक्यातील शेती व शेतकरी विकसित व्हावा, शेती शाश्वत व्हावी, यासाठी बारामती अँग्रीकल्चर डेव्हल्पमेंटचे चेअरमन राजेंद्र पवार यांनी पुढाकार घेतला असून, खरीपाच्या पेरणीपूर्वी चार दिवस कार्यशाळा घेऊन शेतकऱ्यांना उत्तम वाण आणि हमकास विक्रमी उत्पादनाचे तंत्र सांगतले; आणि आता शेतात जोमदार-डौलदार पिक उभी असताना पिकाला आवश्यक ते घटक मिळावेत, काही आडचणी असतील, तर त्यावर मात करावी; याकरिता एक दिवसीय शिवार फेरी केली.

या वेळी त्यांच्यासमवेत राहुरी, बारामतीचे शास्त्रज्ञ, कृषी विभागाचे अधिकाऱी बरोबर होते. यानिमित्ताने थेट शेतावर जाऊन शेतकऱ्यांशी त्यांनी सुसंवाद साधला. आमदार रोहित पवार यांच्या अग्रहाखातर गेली वर्षभरापासून येथील शेती विकसित व्हावी, उत्पन्न वाढावे, शेतकऱ्यांना आर्थिक पाठबळ मिळावे, याकरिता राजेंद्र पवार हे बारामती ऍग्रिकल्चरल डेव्हलपमेंटच्या शास्त्रज्ञां बरोबर घेऊन  येथे काम करीत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून गुरूवारी दोन्ही तालुक्यातून शिवार फेरी काढण्यात आली. थेट शेतकऱ्याच्या प्लॉटवर जाऊन पिकाची पाहणी केली. यानिमित्ताने शाश्वत शेतीची संकल्पना कृतीतून उतरावी, प्रत्यक्षात पीक उभे असताना शेतकऱ्यांना पूरक मार्गदर्शन मिळावे, यासाठीचा हा प्रयत्न शेतकऱ्यांना ही चांगलाच भावला. या वेळी कर्जत तालुक्यातील कोपर्डी व मिरजगाव याठिकाणी तसेच जामखेड तालुक्यातील साकत व खर्डा याठिकाणी शेती दिन साजरा करण्यात आला.

या वेळी राजेंद्र पवार म्हणाले, "पिक नियोजनामध्ये सुधारित वाण, जैविक खते किटनाशके यांचा वापर तसेच शेतकरीचे पिक निहाय गट तयार करावे.

विवेक भोईटे यांनी पिक प्रत्यक्षिकेमधील सोयाबीन, खरीप पिकांचे अन्न द्रव्य व्यवस्थापन या विषयावर मार्गर्शन केले. संतोष करंजे यांनी खरीप हंगामातील पिक नियोजन व नविन वाण या विषयक मार्गदर्शन केले.

यामध्ये कर्जत येथील कोपार्डी हरिश्चद्र सुद्रिक, मिरजगाव येथील विलास हजारे, जामखेड तालुक्यातील खर्डा. नितीन गोलेकर, चंद्रकांत गोलेकर व साकत येथी महादेव वराठ यांच्या शेतावर पिक प्रत्यक्षिके झाली. या ठिकाणी शेती दिन साजरा करण्यात आला.

Edited By - Murlidhar Karale

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख