के. के. रेंजप्रश्नी शेतकऱ्यांसाठी आता शरद पवारच तारणहार : लंके - K. K. Range Question Now Sharad Pawar is the savior for farmers: Lanka | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

शरद पवार म्हणतात, "मला वाटतं मुख्यमंत्री व्हावं, कुणी करणार का.."
धनंजय मुंडे यांच्यावरील बलात्काराची तक्रार मागे

के. के. रेंजप्रश्नी शेतकऱ्यांसाठी आता शरद पवारच तारणहार : लंके

सनी सोनावळे 
सोमवार, 10 ऑगस्ट 2020

आर्थिक सुबत्ता आली.आम्हाला मोबदल्याचे आमिषही दाखविले जाईल. रक्कम वाढवून देतो, असेही म्हटले जाईल; मात्र आम्हाला यातील काहीच नको. आमची जमीनच हवी आहे.

टाकळी ढोकेश्वर : के. के. रेंजचा प्रश्न मोठा आहे. शेतकऱ्यांनी मोठ्या कष्टाने जमिनी बागायती केल्या आहेत. या पुढे शेतकरी एक इंचही जमिनी देणार नाहीत. यासाठी आपण लढा देऊ. या प्रश्नी शेतकऱ्यांचे तारहणहार असलेले शरद पवार हेच मदत करू शकतील. त्यांची भेट घेऊन प्रश्न सोडवू, असे आश्वासन आमदार नीलेश लंके यांनी दिले.

पारनेर येथे आज वडगाव सावताळ, वनकुटे, गाजदीपूर, ढवळपुरी यासह अन्य गावांमधील रहिवाशांनी लंके यांची भेट घेऊन के. के. रेंज जमीन अधिग्रहणाबाबत चर्चा केली. लंके म्हणाले, की पूर्वी वडगाव सावताळ, वनकुटे, गाजदीपूर यांसह परिसरातील अन्य गावे जिरायत भाग होता; आता मात्र यामध्ये मोठ्या प्रमाणावर बदल होत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचे आता नुकसान होऊ देणार नाही.

या वेळी शेतकऱ्यांनी विविध प्रश्न मांडले. आर्थिक सुबत्ता आली.आम्हाला मोबदल्याचे आमिषही दाखविले जाईल. रक्कम वाढवून देतो, असेही म्हटले जाईल; मात्र आम्हाला यातील काहीच नको. आमची जमीनच हवी आहे. तुम्ही पुढाकार घ्या, अशी मागणी ग्रामस्थांनी लंके यांच्याकडे केली. 

लंके यांनीही ग्रामस्थांना धीर देत सैन्यदलातील अधिकारी कोणी दुसरे नाहीत. तीही माणसेच आहेत. जमीन अधिग्रहण करायचे आहे, तर तिकडे राजस्थानमधील करा. आमच्या शेतकऱ्याने कष्टाने तयार केलेल्या जमिनीला त्रास देऊ नका. जमीन अधिग्रहण न करण्यासाठी जे काही करता येईल ते करणार आहे. या विषयाचा सखोल अभ्यास केला आहे. कागपत्रासह पवार यांची पुढील आठवड्यात भेट घेणार आहे, असे लंके यांनी सांगितले.

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख