Just like the Modi government's Chinese infiltration. Answer: Vikhe Patil | Sarkarnama

मोदी सरकारकडून चीनच्या घुसखोरीला जशास तसे उत्तर : विखे पाटील

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 1 जुलै 2020

कोरोनाच्या बाबतीतही देशपातळीवर चांगली कामगिरी असल्याने जगात देशाची मान उंचावली आहे. आगामी काळातही मोदी यांच्या नेतृत्त्वाखाली योग्य नियोजन होऊन कोरोनाला नष्ट करणे शक्य होणार आहे.

 

https://www.facebook.com/MySarkarnama/posts/1340943349448612

शिर्डी : "कोरोनाच्या संकटाचा खंबीरपणे मुकाबला केला. चीनच्या घुसखोरीला जशास तसे उत्तर देण्याची धमक दाखविली. मोदी सरकार हे खंबीर सरकार आहे, `` असे प्रतिपादन आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले.

जनसंवाद अभियानाचा प्रारंभ विखे पाटील यांच्या हस्ते झाला. त्या वेळी ते बोलत होते. जिल्हाध्यक्ष राजेंद्र गोंदकर, नगराध्यक्ष अर्चना कोते आदी उपस्थित होते.

विखे पाटील म्हणाले, की घटनेतील 370 वे कलम व तिहेरी तलाक रद्द करणे, अयोध्येतील श्रीराम मंदिराच्या उभारणीचा प्रारंभ, असे महत्त्वाचे निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने घेतले आहेत. त्यामुळे मोदी सरकार चांगले काम करीत आहे. कोरोनाच्या बाबतीतही देशपातळीवर चांगली कामगिरी असल्याने जगात देशाची मान उंचावली आहे. आगामी काळातही मोदी यांच्या नेतृत्त्वाखाली योग्य नियोजन होऊन कोरोनाला नष्ट करणे शक्य होणार आहे.

ती व्हर्च्युअल सभा तीन लाख लोकांनी पाहिली

संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांची नुकतीच व्हर्च्युअल सभा झाली. ती नगर जिल्ह्यातील उत्तर भागात सुमारे तीन लाख लोकांनी पाहिली. त्यामुळे भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आहे. माजी आमदार स्नेहलता कोल्हे, बाळासाहेब मुरकुटे, वैभव पिचड व सीताराम भांगरे यांच्या पुढाकारातून उत्तर नगर जिल्ह्यात जनसंवाद अभियान राबविले जात आहे, असे जिल्हाध्यक्ष राजेंद्र गोंदकर यांनी सांगितले.

हेही वाचा...

ग्रामपातळीवरील कोरोना रोखण्यासाठी उपाययोजना हव्यात

ग्रामपातळीवर कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी विशेष यंत्रणा सक्रीय करण्याची गरज आहे. यापूर्वी संपूर्ण लाॅकडाऊन असताना सरपंच, ग्रामसेवक,तलाठी, अंगणवाडी सेविका आदी कोरोना वाॅरिअर बनून गावाचे रक्षण करीत होते, आता मात्र लाॅकडाऊन शिथिल केल्यामुळे सर्व शांत झाले आहेत. परिणामी कोरोनाचा प्रादुर्भाव गावपातळीवर वाढण्याचा धोका आहे.

नगर शहरात सध्या कोरोनाचा धुमाकुळ सुरूच आहे. त्या पार्श्वभूमीवर जवळील खेड्यांमधील लोकांची ये-जा शहरात सुरू असते. त्यांच्या संसर्गाने ग्रामीण भागातील लोकांनाही हा धोका असून, लोक विशेष काळजी घेताना दिसत नाही. प्रशासनाकडूनही विशेष सूचना किंवा काळजी घेण्यासाठी कोणाची नियुक्ती केलेली नाही. त्यामुळे बहुतेक गावांत बाहेरून येणाऱ्या लोकांवर कुणीही नजर ठेवत नाहीत. सरपंच व इतर सदस्य आपापल्या कामात व्यस्त आहेत. साहजिकच मुंबई, पुणे तसेच नगरहून अनेक कुटुंब आपल्या मुळ गावी आलेले आहेत. त्यांची योग्य पद्धतीने तपासणी करून उपाययोजना करण्यीच गरज असताना तसे मात्र होताना दिसून येत नाही. याबाबत प्रशासनाने लक्ष देवून प्रत्येक गावात आरोग्यरक्षकदल पुन्हा सक्रीय करावे, अशी मागणी होत आहे.

 

 

 

 
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख