जयंत पाटील यांच्या सूचना ! कोरोना असेपर्यंत मदतकार्य चालूच ठेवा - Jayant Patil's suggestions! Continue the relief work until Corona is there | Politics Marathi News - Sarkarnama

जयंत पाटील यांच्या सूचना ! कोरोना असेपर्यंत मदतकार्य चालूच ठेवा

मुरलीधर कराळे
रविवार, 26 जुलै 2020

ज्येष्ठ नेते शरद पवार रात्रंदिवस राज्यभर दौरे करून आढावा घेत आहेत. त्यांच्या कार्याची प्रेरणा घेऊन आम्ही काम करत आहोत. राष्ट्रवादी कॉंग्रेसने संपूर्ण राज्यात मोठे मदत कार्य उभारले आहे.

नगर : कोरोनाचा संसर्ग सर्वत्र वाढतच आहे. संकट मोठे म्हणून राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी राज्यभर मदतकार्य उभारले आहे. जोपर्यंत कोरोना महापारीचे संकट जात नाही, तोपर्यंत मदतकार्य सुरूच ठेवा, अशा सूचना जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी दिला.

मंत्री पाटील यांनी काल रात्री आमदार अरुण जगताप यांच्या निवासस्थानी भेट दिली. या वेळी त्यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. आमदार संग्राम जगताप यांनी त्यांचे स्वागत व सत्कार केला. या वेळी राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, माजी आमदार राहुल जगताप, शहराध्यक्ष माणिक विधाते, बाळासाहेब जगताप, सुमतीलाल कोठारी आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. या वेळी आमदार जगताप यांनी नगर शहरात राष्ट्रावादी काँग्रेसच्या माध्यमातून चालू असलेल्या मदत कार्याची माहिती दिली. 

राष्ट्रवादी काॅंग्रेसच्यावतीने शहरात विविध उपक्रम सुरू आहेत. कोरोनाच्या काळात पक्षाच्या वतीने मदतकार्य सुरू होते. लाॅक डाऊनच्या काळात आमदार संग्राम जगताप यांनी गरजुंना धान्य, जेवण, किराणा वाटप केले. त्यामुळे अनेक परप्रांतीयांना आधार मिळाला होता. आैद्योगिक वसाहत परिसरातील परप्रांतीय कामगारांना किराणा मालाचे वाटप त्यांच्या घरपोहोच केले. त्यामुळे त्यांना मोठा दिलासा मिळाला होता. त्या वेळी फोन केला, की किराणा पोहोच करण्याची व्यवस्था जगताप यांनी केली होती. या सर्व कार्याची माहिती मंत्री पाटील यांना देण्यात आली.

या वेळी बोलताना पाटील म्हणाले, की ज्येष्ठ नेते शरद पवार रात्रंदिवस राज्यभर दौरे करून आढावा घेत आहेत. त्यांच्या कार्याची प्रेरणा घेऊन आम्ही काम करत आहोत. राष्ट्रवादी कॉंग्रेसने संपूर्ण राज्यात मोठे मदत कार्य उभारले आहे. नगरमध्येही आमदार जगताप यांनी सुरु केलेले मदतकार्य कौतुकास्पद आहे. ऐतिहासक वारसा असलेल्या गुणे आयुर्वेद रुग्णालयात कोविड उपचार सेंटर सुरु करून रुग्णांना दिलासा दिला आहे. जोपर्यंत ही महामारी जात नाही, तोवर सर्वसामान्यांना आधार व मदत कार्य राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी चालूच ठेवावे. सरकार सर्वोतोपरी सहकार्य करत आहे.

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख