घाटघर प्रकल्पग्रस्तांसाठी जयंत पाटील यांचे हे मोठे आश्वासन - This is Jayant Patil's big assurance for the victims of Ghatghar project | Politics Marathi News - Sarkarnama

घाटघर प्रकल्पग्रस्तांसाठी जयंत पाटील यांचे हे मोठे आश्वासन

शांताराम काळे
बुधवार, 12 ऑगस्ट 2020

आपल्या हक्काच्या मागण्यांसाठी केलेल्या घाटघर प्रकल्पग्रस्त आदिवासी शेतकऱ्यांच्या आंदोलनास अखेर यश मिळाले आहे. जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी प्रलंबित मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासन जलसंपदामंत्री प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना दिले.

अकोले : आपल्या हक्काच्या मागण्यांसाठी केलेल्या घाटघर प्रकल्पग्रस्त आदिवासी शेतकऱ्यांच्या आंदोलनास अखेर यश मिळाले आहे. जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी प्रलंबित मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासन जलसंपदामंत्री प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना दिले.

घाटघर प्रकल्पग्रस्त आदिवासी शेतकरी आपल्या हक्काच्या मागण्या, संगमनेर न्यायालयाने दिलेल्या निर्णयानुसार शेतीचा मोबदला द्यावा, घरटी एका माणसाला कायमस्वरूपी सरकारी नोकरी व शेतीसाठी लव्हाळवाडी केटीवेअरमधुन पाणी द्यावे, इतर मागण्यांसाठी सतत आंदोलन सुरू होते, मात्र सरकार गांभिर्याने दखल घेत नसल्याने ता. ५ आॅगष्ट रोजी प्रकल्पग्रस्तांनी ठिय्या आंदोलन करीत विद्युतनिर्मिती चाक बंद केले. त्यावेळी तालुक्याचे आमदार डॉ. किरण लहामटे व अशोक भांगरे यांनी आंदोलनकर्त्यांना जलसंपदामंत्री जयंत पाटील यांच्यासोबत बैठक घेऊन प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन दिले. त्यानुसार काल (मंगळवारी) संबंधितांमध्ये बैठक झाली व आदिवासी प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य करण्याचे आश्वासन जलसंपदा मंत्र्यांनी दिले, अशी माहिती देविदास खडके यांनी दिली.

या आदिवासी शेतकरी प्रकल्पग्रस्त शेतकरी आंदोलनकर्त्यानी आपले प्रश्न मार्गी लावण्यासाठी केलेल्या पाठपुरावा मिळालेले यश आहे, असे मत धोंडीबा सोंगळ यांनी व्यक्त केले.

Edited By - Murlidhar Karale

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख