या माजी आमदारांच्या घरी रोजच भरतो जनता दरबार - The Janata Darbar fills the house of these former MLAs every day | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

कोरोना इफेक्ट : राज्य माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात येणाऱ्या दहावीच्या परीक्षा रद्द
सातारा : कोयना परिसर भूकंपाच्या धक्क्याने हादरला. भुकंपाची साखळी वेळ-3.22 रिश्टर स्केल-3.00, वेळ-3.44 रिश्टर स्केल-2.8.

या माजी आमदारांच्या घरी रोजच भरतो जनता दरबार

शांताराम काळे
रविवार, 1 नोव्हेंबर 2020

निवडणुकीत पराभूत झाल्यानंतर काही काळ पिचड नाराज होते. मात्र सामाजिक कार्यात स्वतःला झोकून देत त्यांनी स्वतःला सावरत जनतेच्या दारात जाणे पसंत केले.

अकोले : वीज, पाणी, रस्ता, रेशन, खावटी, नोकरी, अन्याय, शेतीचे नुकसान आदी बाबी व प्रश्न घेऊन माजी आमदार वैभव पिचड यांच्या दालनात रोज तालुक्यातील माणसे येतात. सकाळी ८ ते १० वाजेपर्यंत या प्रश्नांची चर्चा होते. धडाधड फोन केले जातात. प्रश्नांची सोडवणूक होते. तरुण, महिला, वृध्द, आपल्या प्रश्नांची सोडवणूक करून घेतात व समाधानी होऊन जातात. हे चित्र माजी आमदार वैभव पिचड यांच्या दालनात रोज पाहायला मिळते.

निवडणुकीत पराभूत झाल्यानंतर काही काळ पिचड नाराज होते. मात्र सामाजिक कार्यात स्वतःला झोकून देत त्यांनी स्वतःला सावरत जनतेच्या दारात जाणे पसंत केले. त्यांच्यासोबत त्यांचे तरुण मित्र कार्यकर्ते तालुक्यात प्रत्येक गावात संपर्क करून आहेत. गेल्या वर्षभरात त्यांनी अनेक प्रश्नांना हात घातला. दूधप्रश्न, खावटी, आदिवासी विद्यार्थी प्रश्न, रस्ते काँक्रिटीकरण, रोजगार, शेतकऱ्याला नुकसान भरपाई, ऑनलाईन शिक्षणात विद्यार्थ्यांना टॅबची मागणी आदी ७० प्रश्न उपस्थित करून सरकारला जाब विचारला. त्यापैकी खावटी प्रश्न मार्गी लावला, शेतकऱ्यांचे भात पीक नुकसान, बोगस बियाणे, कला, क्रीडा शिक्षक या प्रश्नांबाबत आक्रमक होत न्याय मिळण्यासाठी पाठपुरावा केला. निळवंडे कालवाप्रश्न असेल, की उपसासिंचन योजनेचा वीज प्रश्न असो. खंबीरपणे भूमिका बजावली, तर कोरोना काळात प्रत्येक गावाला भेट देऊन कोरोना योद्धांना पाठबळ देऊन त्यांचे कौतुक केले.

अर्सेनिक अल्बम ३० गोळ्याचे वाटपही केले. कोरोना रुग्णांना चांगली सुविधा उपलब्ध करून तालुक्यातील सर्व खासगी सरकारी डाॅक्टरांना विश्वास देऊन त्यांच्या कामाला गती दिली. त्यामुळे तालुक्यातील जनता रोज त्यांच्या निवासस्थानी जाऊन, `भाऊ आमचा प्रश्न सोडवा` म्हणत गर्दी करू लागले आहेत. वैभव पिचड न थकता आलेल्या प्रश्नांना योग्य न्याय देऊन जिल्हाधिकारी, जिल्हा पोलिस, प्रांत तहसीलदार, गटविकास अधिकारी, तालुका कृषी अधिकारी, वनविभाग, आदिवासी विकास, आदिवासी महामंडळ सर्व प्रशासकीय कार्यालयातील प्रश्नांची सोडवणूक केली. त्यामुळे आता रोजच त्यांच्या दालनात जनता दरबार भरू लागला आहे.

दरम्यान, मागील वर्षी विधानसभेच्या निवडणुकीत पराभव झाल्यानंतर पिचड यांनी जनतेची कामे करण्यात खंड पडू दिला नाही. त्यामुळे तालुक्यातील लोक आमदारांकडे नव्हे, तर माजी आमदारांकडे प्रश्न घेऊन जातात. आदिवासी पट्ट्यातील लोकांना प्रश्न घेऊन तालुका पातळीवर किंवा जिल्हा पातळीवर जाणे शक्य नसते. त्यामुळे स्थानिक पातळीवरील नेत्यांकडून प्रश्न सोडवूऩ घेण्याचा लोक प्रयत्न करतात. 

Edited By - Murlidhar Karale

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख