`स्वच्छ सर्वेक्षण`मध्ये जामखेडला देशात पहिल्या दहा क्रमांकात यायचंय ! - Jamkhed wants to be in the top ten in the country in 'Clean Survey'! | Politics Marathi News - Sarkarnama

`स्वच्छ सर्वेक्षण`मध्ये जामखेडला देशात पहिल्या दहा क्रमांकात यायचंय !

वसंत सानप
रविवार, 20 सप्टेंबर 2020

स्वच्छ सर्वेक्षण २०२१ च्या स्पर्धेच्या तयारीसाठी आमदार रोहित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत नुकतीच समन्वय समितीची बैठक झाली.

जामखेड : "देशांमध्ये स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धा होत असून, विविध गटांमध्ये होणाऱ्या या स्पर्धेत जामखेड शहराला पहिल्या दहा क्रमांकात स्थान मिळावे, यासाठी आमदार रोहित पवार यांनी जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत. यासाठी सर्व पक्षांचे पदाधिकारी, शासकीय अधिकारी, व्यापारी संघटना, सर्व ग्रामस्थांनी एकत्र येण्याचे आवाहन केले आहे. स्वच्छता सर्वेक्षण लोक चळवळ झाली पाहिजे," असे मत आमदार रोहित पवार यांनी मांडले. 

स्वच्छ सर्वेक्षण २०२१ च्या स्पर्धेच्या तयारीसाठी आमदार रोहित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत नुकतीच समन्वय समितीची बैठक झाली. या वेळी 'गारबेज क्लिन'चे संचालक प्रविण नायक, स्वच्छ सर्व्हेक्षण कॅन्सलटंट 'एबी फर्म' चे भुषण देशमुख,
मुख्याधिकारी मिनीनाथ दंडवते, प्रा. मधुकर राळेभात, प्रा. राजेंद्र पवार, सुरेश भोसले, रमेश आजबे या बैठकीत सहभागी झाले होते. 

या वेळी आमदार रोहित पवार म्हणाले, "स्वच्छ सर्वेक्षण २०२१ च्या स्पर्धेच्या तयारीसाठी आमदार रोहित पवार यांच्या उपस्थितीत नुकतीच समन्वय बैठक घेण्यात आली होती. जामखेड शहरातील सर्व पक्षांचे पदाधिकारी, शासकीय अधिकारी, व्यापारी संघटना सर्व ग्रामस्थांनी देशात जामखेड शहराची वेगळी ओळख निर्माण होण्यासाठी व स्वच्छ सर्वेक्षणात स्थान मिळवण्यासाठी एकत्र येण्याचे आवाहन केले.

स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धेची नामांकने, याचे निकष व या स्पर्धेत घ्यावयाची काळजी अशा विविध बाबींची माहिती दिली. तसेच स्वच्छता सर्वेक्षण लोक चळवळ झाली पाहिजे, असे मत आमदार रोहित पवार यांनी मांडले.

या वेळी भुषण देशमुख म्हणाले, "भारतात सुरू असलेल्या स्वच्छता मोहिमेची सविस्तर माहिती देत 'कचरा मुक्त शहर' ही मोहीम आगामी काळात राबविण्यात येणार असल्याचा संकल्प व्यक्त केला, तसेच जामखेड शहराला आदर्श मॉडेल करण्याचा विचार मांडला. यासाठी विविध ठिकाणी सुरू असलेल्या उपक्रमांची व्हिडिओद्वारे माहिती दिली.

Edited By - Murlidhar Karale

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख