जामखेडमध्ये राजकारणाविरहित युवक एकत्र, बनले हजारोंचे अऩ्नदाते

'राष्ट्रभक्ति हीच देशभक्ती' याविचाराने प्रेरित झालेल्या या युवकांनी कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेल्या आपत्तीप्रसंगीमाणुसकीचेदर्शन घडवले.
healp
healp

जामखेड : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जामखेड शहरातील 35 युवकांनी राजकारणाविरहित एकत्र येऊन गरजूंना तब्बल दोन महिने दोन वेळचे जेवण लोकवर्गणीतून बनवून देण्याचा उपक्रम राबविला. हा उपक्रम पांडुराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली 'हिंदुस्तान प्रतिष्ठान' या संघटनेच्या माध्यमातून नित्य चालला. हे युवक संभाजी भिडे गुरुजीं धारकरी आहेत.

याकाळात दररोज 1500 गरजू व्यक्तींना या युवकांनी घरपोहच जेवण पुरविले आहे. आता अखेरच्या टप्प्यात गरजूंना घरपोहोच किराणा देण्याचा उपक्रम या युवकांनी सुरू केला आहे. त्यांच्या या स्तुत्य उपक्रमास तालुक्यातील 40 गावातील युवकांनी स्वयंप्रेरणेने मदतीचा हात दिला. 'राष्ट्रभक्ति हीच देशभक्ती' या विचाराने प्रेरित झालेल्या या युवकांनी कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेल्या आपत्तीप्रसंगी माणुसकीचे दर्शन घडवले.

सलग दोन महिन्यांपासून  आपल्या शहरातील एकही मनुष्य उपाशीपोटी झोपणार नाही, अशी शपथ घेऊन प्रत्येकाने खारीचा वाटा उचलला. हा अन्नछत्राचा गाडा चालवला. आर्थिक दृष्ट्या सर्वसामान्य कुटुंबातली ही मुलं, मनाने आणि विचाराणे फार मोठे ठरले. आपल्या गावावर आलेल्या संकटाला डगमगून न जाता मोठ्या धैर्याने त्यांनी तोंड दिले. शहरांमध्ये एकापाठोपाठ 17 कोरोना बाधित रुग्ण आढळल्याने सर्वांच्या तोंडचे पाणी पळाले होते. प्रशासन खडबडून जागे झाले होते. कोरोना रोखण्यासाठी प्रशासन सर्वतोपरी प्रयत्न करीत होते. प्रत्येकजण घरात थांबला होता. रस्त्यावर कुणी दिसत नव्हते .घरात असेल ते खाऊन दिवस काढले जात होते. मात्र दररोज कमवल्याशिवाय खिशात पैसा येत नाही आणि पैसा आल्याशिवाय दररोजची दिनचर्या पूर्ण होत नाही, असे शेकडो कुटुंब दोन वेळच्या जेवणासाठी भुकेली असताना स्वतःची तहान भूक विसरुन त्यांना दोन घास भरण्यासाठी अन्नछत्राचा उपक्रम ही तरुण मुलं जामखेड शहरात चालवित होते. 

दररोज या गरजवंतांना अन्नपुरवठा करताना त्यांना नाविन्यपूर्ण काय देता येईल, यावर या युवकांचा भर राहिला. या डब्यामध्ये गोड-धोड सुद्धा या युवकांनी पुरवले. त्यांनी राबवलेल्या या अन्नछत्राचा उपक्रम संपूर्ण तालुक्यामध्ये चर्चेचा आणि कौतुकाचा ठरला. प्रत्येकाचे दुःख वाटून घेण्याचा केलेला हा प्रयत्न कमी वयात त्यांनी दाखवलेले औदार्य निश्चितपणे प्रेरणादायी ठरणारे आहे.

या गावांनी केली मदत

या उपक्रमात जामखेडसह नायगाव, नाहूली , शिऊर, पिपंरखेड, धानोरा ,चौडीं, आगी, डोणगाव, जवळा, पोतेवाडी, सोनेगाव, वाघा, कुसडगाव सारोळा, पाडळी ,झिक्री, दैवदैठन, धामणगाव, घोडेगाव, पिपंळगाव (आवळा), आपटी, साकत, काटेवाडी, तेलंगशी, दिघोळ, धोत्री,  सावरगाव, फ्रकाबाद, हळगाव, दौंडाचीवाडी, नान्नज, रत्नापुर ,अरणागाव, पाटोदा, खाडंवी, खर्डा तसेच शहरातील अनेक शिवप्रेमींनी मदत केली.

परप्रांतीय लोकांनाही मदतीचा हात

शहरात अडकलेल्या साडेपाचशे परराज्यातील नागरिकांनाही या युवकांनी मोठ्या आस्थेवाईकपणे दररोजचे जेवण देण्याचे काम केले. तसेच राज्याच्या विविध भागातून येणाऱ्या व जामखेडमध्ये अडकून पडणाऱ्या ऊसतोडणी कामगार, भटके-विमुक्त, तसेच रोजगारासाठी स्थलांतरित झालेले नागरिकांनाही दोन वेळच्या जीवनाबरोबरच या ठिकाणाहून आपल्या मूळगावी जाण्यासाठी या धारकांनी केलेली मदत वाखाणण्याजोगी राहिली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com