`जलयुक्त`मध्ये पाणी मुरले की पैसा हे चाैकशीतून स्पष्ट होईल - It will be clear from the check that the water has dried up in the 'watery' | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

दहावी व बारावीच्या परीक्षा पुढे ढकलल्या : शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांची घोषणा. याशिवाय सीबीएसई, आयसीएसई आदी बोर्डांनीही त्या पुढे ढकलाव्यात अशी राज्य सरकारची सूचना
Breaking - दहावी-बारावीच्या परिक्षा पुढे ढकलल्या

`जलयुक्त`मध्ये पाणी मुरले की पैसा हे चाैकशीतून स्पष्ट होईल

मुरलीधर कराळे
गुरुवार, 15 ऑक्टोबर 2020

जलयुक्त शिवार योजनेचा फुगा कॅगच्या अहवालाने फुटला. तब्बल 9 हजार 633 कोटी रुपये खर्च करून भूजलपातळीत वाढ झाली नसेल तर, असा आरोप आमदार रोहित पवार यांनी केला आहे.

नगर : जलयुक्त शिवार योजनेची एसआयटीमार्फत चाैकशी करण्याचा निर्णय घेतल्याबद्दल राज्य सरकारचे आभार. या चाैकशीतून ही खरंच जलयुक्त योजना होती, की या योजनेत पाण्याऐवजी फक्त पैसेच मुरले हे स्पष्ट होईल, असा टोला आमदार रोहित पवार यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना लगावला आहे.

भाजप सरकारच्या काळात तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जलयुक्त शिवार योजना आणली. ती राज्यभर प्रभावीपणे राबविली. मात्र त्यासाठी मोठा खर्च झाला. या योजनेमुळे भूजलपातळी वाढल्याचे अनेकदा तत्कालीन सरकारने स्पष्ट केले. त्याची जाहिरातही मोठी केली. जाहिरातबाजीवरही मोठा खर्च झाला होता. त्या-त्या वेळी विरोधकांनी आरोपही केले होते. 

मागील महिन्यात आमदार रोहित पवार यांनी या योजनेविषयी ट्विटरच्या माध्यमातून आरोप केला होता. ते म्हणाले होते की, ``ग्रामीण भागासाठी क्रांतिकारी योजना असल्याचा मागील भाजप सरकारने गाजावाजा केला होता. जलयुक्त शिवार योजनेचा फुगा कॅगच्या अहवालाने फुटला. तब्बल 9 हजार 633 कोटी रुपये खर्च करून भूजलपातळीत वाढ झाली नसेल तर..`` अशी शंका पवार यांनी उपस्थित केली होती. आता या योजनेची चाैकशी करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यामुळे या चाैकशीतून योग्य ते बाहेर येईलच. त्यामध्ये नेमका पाणी मुरले की पैसा मुरला हे लवकरच स्पष्ट होईल, असा टोला भाजपला पवार यांनी लगावला आहे.

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख