नाट्यगृहाच्या कामाऐवजी निधी वळवून त्यांनी काढली बिले : स्नेहलता कोल्हे यांचा आरोप - Instead of working on the theater, he diverted funds and issued bills: Snehalta Kolhe | Politics Marathi News - Sarkarnama

नाट्यगृहाच्या कामाऐवजी निधी वळवून त्यांनी काढली बिले : स्नेहलता कोल्हे यांचा आरोप

मनोज जोशी
शुक्रवार, 26 मार्च 2021

नाटय रसिकांच्या आग्रहाखातर कोपरगावकरांसाठी आधुनिक बंदिस्त नाटयगृह व्हावे म्हणून राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचेकडे पाठपुरावा करून निधी व जागा मिळावी म्हणून मागणी केली होती.

कोपरगाव : शहरातील नाटय रसिकांसाठी बंदिस्त नाटयगृहाला एक एकरची जागा उपलब्ध करून दोन कोटींचा निधी मिळवून दिला. नाटयगृहाचे काम सुरू करण्याऐवजी विदयमान लोकप्रतिनिधी, नगराध्यक्ष आणि मुख्याधिकांरी यांनी संगनमत करून बिले काढण्यासाठीच निधी दुसरीकडे वळविला आहे. ही कोपरगावकरांच्या दृष्टीने दुर्दैवाची बाब असल्याची टीका माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांनी केली आहे.

प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात त्यांनी म्हंटले, की नाटय रसिकांच्या आग्रहाखातर कोपरगावकरांसाठी आधुनिक बंदिस्त नाटयगृह व्हावे म्हणून राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचेकडे पाठपुरावा करून निधी व जागा मिळावी म्हणून मागणी केली होती. त्यानुसार नाटयगृहासाठी 2 कोटी रूपयांचा निधी उपलब्ध करून दिला तसेच पाटबंधारे विभागाची सुमारे एक एकर जागाही दिली. 20 मार्च 2015 रोजी वैशिष्ट्यपूर्ण योजनेअंतर्गत शासनाच्या नगरविकास विभागाच्या शासन निर्णयानुसार 2 कोटी रूपयाचा निधी कोपरगाव नगरपरिषदेला वितरीत करण्यात आला. तसेच इरिगेशन बंगल्याजवळील पाटबंधारे विभागाची जागाही या नाटयगृहासाठी मिळवून देण्यासाठी पाठपुरावा केला होता. त्यानुसार शहरात आधुनिक नाटयगृहास जलसंपदा विभागाच्या मालकीची स.नं.1935 व 1939 मधील जागेपैकी एक एकर जागा महामंडळाच्या नियामक मंडळाच्या विपय क्र.65/2,ठराव क्र.65/18 अन्वये नाटयगृह बांधण्याकरीता हस्तांतरीत करणे व करारनामा करून घेणेबाबत उपविभागीय अभियंता, गोदावरी डावा तट कालवा, उपविभाग, कोपरगाव यांनी कोपरगाव नगरपरिषदेस कळविले होते.

वास्तविक अथक परिश्रम करून आपण बंदिस्त नाटयगृहासाठी निधी मंजुर करून आणला, तसेच जागाही उपलब्ध करून दिली, फक्त जागा ताब्यात घेउन काम सुरू करणे बाकी असताना सदरचा निधी अन्यत्र वळवून बिले काढण्यासाठीचाच विरोधकांनी हा खटाटोप केला असल्याचे कोल्हे म्हणाल्या.

राजकीय द्वेषापोटी श्रेय मिळू नये म्हणून हे काम प्रलंबित ठेवून त्यासाठीचा मंजूर असलेला निधी पळविण्याचे काम करून कोपरगावच्या नाटयरसिकांचा भ्रमनिरास केला असल्याची खंतही कोल्हे यांनी व्यक्त केली.
 

हेही वाचा..

कोपरगावमध्ये विविध कार्यक्रम

कोपरगाव : माजी मंत्री शंकरराव कोल्हे यांचा वाढदिवस मतदार संघात विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करून साजरा करण्यात आला. भारतीय जनता पार्टी दिव्यांग सेलच्या वतीने मतदार संघातील दिव्यांग बांधवांना जिल्हा रूग्णालय येथे पाठपुरावा करून योजनेचा लाभ मिळवून प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले.

आॅनलाईन उपलब्ध झालेल्या प्रमाणपत्राचे वाटप दिव्यांग सेलचे तालुकाध्यक्ष मुकुंद काळे, भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष दत्तात्रय काले यांचे हस्ते करण्यात आले. यावेळी दिव्यांग सेलचे उपाध्यक्ष संदीप शहाणे, सचिव जयवंत मरसाळे, अल्पसंख्याक सेलचे खलीक कुरेषी या वेळी उपस्थित होते.

पोहेगाव व चांदेकसारे येथे वृक्षारोपणाचा कार्यक्रम घेण्यात आला, यावेळी कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष आप्पासाहेब दवंगे, बापुसाहेब औताडे, चंद्रकांत औताडे, बापुसाहेब औताडे, राजेंद्र औताडे, निखिल औताडे, औताडे, केशव होन, आप्पासाहेब होन, धीरज बोरावके, आदीसह ग्रामस्थ उपस्थित होते.

करंजी येथे उपसरपंच रविंद्र आगवन यांचे हस्ते दिव्यांग बांधवांना प्रमाणपत्र वाटप, तर संजीवनी युवा प्रतिप्ठाणच्या वतीने कोकमठाण येथील गोशाळेत चारावाटप करण्यात आले. या वेळी युवासेवक मोठया संख्येने हजर होते.

संवत्सर ग्रामपंचायतीचे सदस्य महेश परजणे यांचे हस्ते दशरथवाडी येथील जिल्हा परिपद शाळेतील विदयाथ्र्यांना मास्क व सॅनिटायझरचे वाटप केले.

जेऊर पाटोदा येथील ज्ञानेश्वर महाराज मंदिरात बसलेल्या पारायणार्थीना सॅनिटाईझर व मास्क चे वाटप करण्यात आले.यावेळी माजी सभापती मच्छिंद्र केकान, सरपंच मनीषा केकान, सतीश केकान, ताराबाई गरुड आदी उपस्थित होते.

हायटेक इंजिनिअरिंग यांच्या वतीने 1100 मास्कचे मोफत वाटप करण्यात आले. 

 

Edited By - Murlidhar Karale

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख