खर्डा येथे सत्तांतर ! राम शिंदे गटाची सत्ता आमदार रोहित पवारांनी हिसकावली - Independence at Kharda! The power of Ram Shinde group was snatched by MLA Rohit Pawar | Politics Marathi News - Sarkarnama

खर्डा येथे सत्तांतर ! राम शिंदे गटाची सत्ता आमदार रोहित पवारांनी हिसकावली

मुरलीधर कराळे
सोमवार, 18 जानेवारी 2021

जामखेड तालुक्यातील खर्डा ग्रामपंचायतीत सत्तांतर झाले असून, भाजपचे माजी मंत्री राम शिंदे यांच्या पॅनलला धुळ चारत राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांच्या पॅनेलचा विजय झाला आहे. राष्ट्रवादीला दहा, तर भाजपला केवळ चार जागा मिळाल्या.

नगर : जामखेड तालुक्यातील खर्डा ग्रामपंचायतीत सत्तांतर झाले असून, भाजपचे माजी मंत्री राम शिंदे यांच्या पॅनलला धुळ चारत राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांच्या पॅनेलचा विजय झाला आहे. राष्ट्रवादीला दहा, तर भाजपला केवळ चार जागा मिळाल्या.

दोन्ही नेत्यांमध्ये ही निवडणूक प्रतिष्ठेची होती. या ग्रामपंचायतीत 17 जागा असून, भाजपचे उपाध्यक्ष रवी सुरवसे यांच्या नेतृत्त्वाखाली पॅनल निवडणूक रिंगणात होते. त्यांना रोखण्यात राष्ट्रवादीचे जिल्हा संघटक विजयसिंह गोलेकर यांनी आवाहन दिले होते. पहिल्याच टप्प्यात भाजपच्या दोन तर राष्ट्रवादीची एक जागा बिनविरोध झाली होती. त्यामुळे उर्वरीत 14 जागांसाठी ही लढत झाली. यापैकी 10 जागा राष्ट्रवादीला मिळाल्या, तर चार जागांवर भाजपला समाधान मानावे लागले. त्यामुळे राष्ट्रवादीचे आता 11 सदस्य झाले असून, ग्रामपंयातीवर निर्वाद वर्चस्व सिद्ध झाले आहे.

दरम्यान, या निवडणुकीकडे महाराष्ट्राचे लक्ष लागले होते. जामखेड तालुक्यात गेल्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीने भाजपवर मात करत सत्ता काबिज केली होती. त्यानंतर विविध स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत राष्ट्रवादीनेच बाजी मारली. आता महत्त्वाच्या ग्रामपंचायतीही राष्ट्रवादीने ताब्यात घेतल्या आहेत. त्यामुळे हा भाजपला मोठा धक्का ठरला आहे.

 

 

 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख