नगर जिल्ह्यात वाढले 280 रुग्ण, ओलांडला 3 हजारांचा टप्पा - Increased to 280 patients in Nagar district, crossed 3000 stage | Politics Marathi News - Sarkarnama

नगर जिल्ह्यात वाढले 280 रुग्ण, ओलांडला 3 हजारांचा टप्पा

मुरलीधर कराळे
शनिवार, 25 जुलै 2020

जिल्ह्यात आज दिवसभरात 280 रुग्ण नव्याने वाढले आहेत. तसेच 44 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यामुळे बरे झालेल्या रुग्णांची संख्या आता 1480 झाली असून, एकूण रुग्ण संख्या ३०६८ झाली आहे.

नगर : जिल्ह्यात आज दिवसभरात 280 रुग्ण नव्याने वाढले आहेत. तसेच 44 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यामुळे बरे झालेल्या रुग्णांची संख्या आता 1480 झाली असून, एकूण रुग्ण संख्या ३०६८ झाली आहे.

आगामी काळात कोरोना चाचण्यांमध्ये वाढ करण्यात येणार असून, त्यासाठी 50 हजार कीटचे नियोजन प्रशासनाने केले आहे. त्यामुळे आगामी काळात रुग्णसंख्याही वेगाने वाढलेली दिलेल अशी शक्यता वर्तविली जात आहे. मात्र वाढत्या चाचण्यांमुळे कोरोना लवकर आटोक्यात येवू शकेल.

जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅबमध्ये १०४, अँटीजेन चाचणीमध्ये १८ आणि खासगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत १५८ जण बाधित आढळून आले. त्यामुळे उपचार सुरू असलेल्या रुग्णांची संख्या आता १५३७ इतकी झाली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 51 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झालेला आहे.

जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅबमध्ये आज सकाळी ७० जण बाधित आढळून आले होते. त्यानंतर सायंकाळी सहा वाजेपर्यंत या संख्येत ३४ रुग्णांची भर पडली. यामध्ये अकोले ४, पाथर्डी २, नेवासे १, नगर ग्रामीण ४, मिलिटरी हॉस्पिटल २, कर्जत १, श्रीरामपूर ११, कोपरगाव ३, मनपा ३, श्रीगोंदा २, संगमनेर येथील १ रुग्णाचा समावेश आहे. अँटीजेन चाचणीत आज १८ जण बाधित आढळले. त्यात राहाता २, पाथर्डी ११, कोपरगाव १, कॅन्टोन्मेंट १ आणि महापालिका भागात 3 रुग्ण आढळून आले.

खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या १५८ रुग्णांची नोंद झाली. यामध्ये महापालिका क्षेत्रात १०४, अकोले १,कर्जत १, नगर ग्रामीण १६, नेवासे ५, पारनेर ५, पाथर्डी २, राहाता १४, राहुरी ३, संगमनेर ३, श्रीगोंदा ३ आणि श्रीरामपूर १ अशा रुग्णांचा समावेश आहे.

नगर शहरातील रुग्णसंख्या वाढतच असून, त्याभोवतालच्या गावांमध्ये रुग्णांची संख्या वाढत आहे. नगर तालुक्यातील ही बहुतेक गावे सध्या बंद आहेत. गावांमध्ये जनता कर्फ्यूचे नियोजन स्थानिक सरपंच, पदाधिकाऱ्यांनी केले आहे. याबरोबरच तालुकापातळीवरील शहरेही गेल्या काही दिवसांपासून बंद आहेत.

पंचमीच्या सण साधेपणाने साजरा

दरम्यान, आज पंचमीचा सण होता. परंतु कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लोकांनी घरीच साजरा केला. आज सार्वजनिक ठिकाणी महिलांनी येण्याचे टाळले. ग्रामीण भागात नागोबाचे पूजन म्हणून वारुळाचे पूजन झाले. मात्र लाॅक डाऊन असलेल्या गावांमध्ये हे पूजन घरच्या घरीच करण्यात आले.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख