अधिकाऱ्यांच्या आडमुठ्या भुमिकेमुळे कोरोना रुग्णात वाढ : खासदार विखे पाटील - Increase in corona patients due to inflexible role of officials: MP Vikhe Patil | Politics Marathi News - Sarkarnama

अधिकाऱ्यांच्या आडमुठ्या भुमिकेमुळे कोरोना रुग्णात वाढ : खासदार विखे पाटील

विलास कुलकर्णी
बुधवार, 30 सप्टेंबर 2020

लोकप्रतिनिधींनी व्यक्त केलेल्या भावनांचा विचार न करता लोकशाही संपविण्याचा प्रयत्न केला. आता कोरोनाचे रुग्ण व मृत्युदर वाढला.

राहुरी : तीन महिन्यांपूर्वी जिल्ह्यात अवघे २०० कोरोना रुग्ण होते. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊनची मागणी केली. परंतु अधिकाऱ्यांनी आडमुठी भूमिका घेतली. लोकप्रतिनिधींनी व्यक्त केलेल्या भावनांचा विचार न करता लोकशाही संपविण्याचा प्रयत्न केला. आता कोरोनाचे रुग्ण व मृत्युदर वाढला, असा गंभीर आरोप खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी प्रशासनावर केला.

श्री विवेकानंद नर्सिंग होम व श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाच्या विद्यमाने पंडित दिनदयाळ उपाध्याय यांच्या जयंती सप्ताहानिमित्त राहुरी महाविद्यालयात सुसज्ज कोविड केअर सेंटरच्या उद्घाटन प्रसंगी खासदार डॉ. विखे पाटील बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी आमदार शिवाजी कर्डिले होते. तनपुरे कारखान्याचे अध्यक्ष नामदेव ढोकणे, माजी अध्यक्ष उदयसिंह पाटील, संचालक शामराव निमसे, सुरसिंग पवार, रवींद्र म्हसे, भाजपा तालुकाध्यक्ष अमोल भनगडे, सुभाष गायकवाड, योगेश देशमुख उपस्थित होते.

खासदार डॉ. विखे पाटील म्हणाले, "राहुरीतील गोरगरीब कोरोनाग्रस्त रुग्णांना प्रतिदिन एक हजार रुपये नाममात्र शुल्कात उपचार होतील. २४ तास डॉक्टर, स्वच्छ खोल्या, पाच दिवसांच्या औषधांच्या गोळ्या, चहा, नाष्टा, दोन वेळचे भोजन अशा उत्तम सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. पैसे कमवण्यासाठी नाही, तर जबाबदारी म्हणून नगर जिल्ह्यातील सर्वात स्वस्त व सुसज्ज कोविड केअर सेंटर सुरू केले. मुळा प्रवरा वीज संस्थेतर्फे सभासदांना राहुरी शहरात सवलतीच्या दरात कोरोना तपासणी केंद्र सुरू केले. मागील तीन वर्षात तनपुरे कारखान्याला ऊस दिलेल्या सभासदांना मुळा प्रवरा संस्थेत सवलतीच्या दरात कोरोना तपासणी केली जाईल." अशी घोषणा खासदार डॉ. विखे-पाटील यांनी केली.

अध्यक्षस्थानावरून बोलताना माजी आमदार कर्डिले म्हणाले, "राहुरी महाविद्यालयाच्या निसर्गरम्य वातावरणात शंभर खाटांचे राहुरी शहरातील पहिले सुसज्ज कोविड केअर सेंटर नगर जिल्ह्यात सर्वोत्कृष्ट आहे.

Edited By - Murlidhar Karale

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख