रावसाहेब दानवे यांच्या प्रतिमेला अकोल्यात मारले जोडे - The image of Raosaheb Danve was killed in Akola | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

कोरोना इफेक्ट : राज्य माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात येणाऱ्या दहावीच्या परीक्षा रद्द
सातारा : कोयना परिसर भूकंपाच्या धक्क्याने हादरला. भुकंपाची साखळी वेळ-3.22 रिश्टर स्केल-3.00, वेळ-3.44 रिश्टर स्केल-2.8.

रावसाहेब दानवे यांच्या प्रतिमेला अकोल्यात मारले जोडे

शांताराम काळे
शनिवार, 12 डिसेंबर 2020

भाजपाचे केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्या प्रतिमेला कोल्हार - घोटी मार्गावर शिवसेनेच्या वतीने जोडे मारत अकोले शहरात आंदोलन करण्यात आले.

अकोले : भाजपाचे केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्या प्रतिमेला कोल्हार - घोटी मार्गावर शिवसेनेच्या वतीने जोडे मारत अकोले शहरात आंदोलन करण्यात आले.

पंजाब व हरियाणा येथील शेतकरी दिल्ली दरबारी आंदोलन करीत असताना या आंदोलनाची दखल घेण्यापेक्षा उलट या आंदोलनाची खिल्ली उडवण्याचे काम भाजपाचे काही लोक करत आहेत. या वेळी दिल्ली येथील आंदोलनाला पाठिंबा व रावसाहेब दानवे यांनी या आंदोलनास पाकिस्तानचा हात आहे व शेतकरी बांगलादेशी असल्याचा अजब दावा केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी केल्याने संपूर्ण देशात दानवे यांच्यावर टीका होत आहे. याचाच एक भाग म्हणून आज अकोले येथेही शिवसेनाच्या वतीने आज जोडे मारो आंदोलन करण्यात आले. या वेळी शिवसैनिकांनी भाजप सरकारच्या विरोधात घोषणा दिल्या. या वेळी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख रामहरी तिकांडे, अकोले तालुका प्रमुख मच्छिंद्र धुमाळ, महेश नवले, मिलिंद रुपवते, प्रदीप हासे, नितीन नाईकवाडी आदी उपस्थित होते.

दरम्यान, दानवे यांनी शेतकऱ्यांचा अपमान केला आहे. पाकिस्तान, बांगलादेश आदींचा संबंध शेतकऱ्यांशी जोडून दानवे यांनी पुन्हा एकदा संकट ओढावून घेतले आहे. यापूर्वीहीही दानवे यांनी शेतकऱ्यांविषयी अपशब्द वापरले होते. तेव्हाही राज्यभर त्यांच्यावर टीका झाली होती. असे असतानाही पुन्हा झालेला हा प्रकार क्लेशदायी असल्याचे शेतकरी नेत्यांनी या वेळी सांगितले.

दानवे यांचा सर्व शेतकऱ्यांनी निषेध व्यक्त केला आहे. शिवसेनेच्या कार्यकर्त्यांबरोबरच शेतकरीही दानवे यांच्या विरोधात त्यांना लाखोली वाहत आहेत. शेतकऱ्यांबाबत यापुढे कोणीही अपशब्द वापरू नये, अशी भूमिका शेतकऱ्यांमधून व्यक्त होत आहे.

 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख