मंत्री आहात तर तुम्ही काय करता ! हजारे यांचे जितेंद्र आव्हाड यांना सडेतोड उत्तर

माझा हा संदेश वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी होता,’ असे ट्वीट केले होते. त्यावर हजारेबोलताना, ‘अरे, तुम्ही तर मंत्री आहात! मग तुम्ही काय करता,’ असा प्रतिप्रश्न आव्हाड यांना त्यांनी केला आहे.
Hajare and avad.jpg
Hajare and avad.jpg

पारनेर : ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे (Anna Hajare) यांना राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री जितेंद्र अव्हाड यांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या; मात्र हजारे यांचे लक्ष वाढती महागाई, कोलमडलेली आरोग्य व्यवस्था, वाढती सामाजिक दरी व सीमेवरील तणाव, याकडे वेधले होते. त्या संदेशात शेवटी, ‘माझा हा संदेश वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी होता,’ असे ट्वीट केले होते. त्यावर हजारे बोलताना, ‘अरे, तुम्ही तर मंत्री आहात! मग तुम्ही काय करता,’ असा प्रतिप्रश्न आव्हाड यांना त्यांनी केला आहे. (If you are a minister, what do you do? Hazare's unequivocal answer to Jitendra Awhad)

आव्हाड यांनी हजारे यांना वाढदिवसाच्या दिवशी ट्वीट करून प्रथम देशातील विविध प्रश्नांकडे लक्ष वेधत शेवटी वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. मात्र, या शुभेच्छा देताना अव्हाड यांनी हजारे यांना जाणीवपूर्वक डिवचण्याचा प्रयत्न केला. त्यांनी दिलेल्या शुभेच्छासंदेशात म्हटले आहे, की देशातील वाढती महागाई, गॅस- डिझेल- खाद्यतेल यांचे गगनाला भिडलेले दर, ढासळती अर्थव्यवस्था, कोरोनामुळे कोलमडलेली आरोग्य व्यवस्था, वाढती सामाजिक दरी व चीनसोबतचा सीमेवरील तणाव याबद्दल नाही, तर वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देण्यासाठी हा मेसेज होता.

या ट्वीटबाबत हजारे यांना विचारले असता ते म्हणाले, ‘‘अरे, तुम्ही तर मंत्री आहात; मग तुम्ही काय करता? मी एक सामान्य माणूस व जनतेचा सेवक आहे. मी जनहिताची अनेक कामे केली आहेत. जनहितासाठी अनेक कायदे सरकारला करणे भाग पाडले आहे. मी शेवटपर्यंत जनहिताची कामे करतच राहणार आहे. मात्र, प्रत्येक गोष्ट मीच का करावी? तुम्ही काय करता? तुम्ही जनतेसाठी काम करत नाही का?’’

सायकल फेरीत साडेबारा हजार तरुण

हजारे यांचा ८४वा वाढदिवस नुकताच झाला. ते वाढदिवसही साजरा करत नाहीत; मात्र कार्यकर्ते त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी विविध सामाजिक उपक्रम राबवितात. यंदाही पर्यावरणाच्या संवर्धनासाठी सायकल फेरीचे आयोजन केले होते. या फेरीत साडेबारा हजारांहून अधिक तरुण सहभागी झाले होते.

हेही वाचा...

Edited By - Murlidhar Karale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com