थोरात मुख्यमंत्री झाल्यास जातियवादी पक्षांचा सुपडा साफ होईल - If Thorat becomes the Chief Minister, the supremacy of communal parties will be cleared | Politics Marathi News - Sarkarnama

थोरात मुख्यमंत्री झाल्यास जातियवादी पक्षांचा सुपडा साफ होईल

संजय आ. काटे
शुक्रवार, 5 फेब्रुवारी 2021

बाळासाहेब थोरात यांच्यामुळे राज्यात कॉंग्रेसची परिस्थिती सुधारली. ते मुख्यमंत्री झाले तर जातीयवादी पक्षांचा सुपडा साफ होईल.

श्रीगोंदे : "बाळासाहेब थोरात यांच्यामुळे राज्यात कॉंग्रेसची परिस्थिती सुधारली. ते मुख्यमंत्री झाले तर जातीयवादी पक्षांचा सुपडा साफ होईल,'' असे मत नागवडे साखर कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे यांनी व्यक्त केले.

मंत्री थोरात यांच्या वाढदिवसानिमित्त शहरातील छत्रपती शिवाजी महाविद्यालयात झालेल्या कॉंग्रेसच्या मेळाव्यात डॉ. तांबे बोलत होते. अध्यक्षस्थानावरून नागवडे बोलत होते.

डाॅ. तांबे म्हणाले, ""राज्यात पक्षाला पुन्हा सत्ता मिळवून देताना, संयमाने सामान्यांचा विकास कसा साधता येतो, हे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी दाखवून दिले.''

तांबे म्हणाले, ""थोरात यांच्या रूपाने निष्ठा, तत्त्व असलेले नेतृत्व मिळाले आहे. त्यांचे राज्यातील नेतृत्व जिल्ह्याच्या दृष्टीने अभिमानास्पद आहे. कार्यकर्त्यांनी पक्षाशी आणि पक्षावर प्रेम करणाऱ्या जनतेशी बांधिलकी, संवाद ठेवला, तर देशात सत्तांतर होऊ शकते, याची जाणीव ठेवून सक्रिय व्हावे.'' 

श्रीरामपूरचे आमदार लहू कानडे म्हणाले, ""जातिधर्मांच्या नावाखाली लोकांच्या भावना फडकावून भाजपने सत्ता काबीज केली. मोदी सरकारने एलआयसी, रेल्वे, विमानतळ विकायला काढल्याने देशाचा विकासदर ढासळला आहे.'' 

तालुकाध्यक्ष दीपक भोसले, बाबासाहेब भोस, आदेश शेंडगे यांचीही भाषणे झाली. 
जिल्हा परिषद सदस्य अनुराधा नागवडे, नगराध्यक्ष शुभांगी पोटे, अरुण पाचपुते, समीर बोरा, बाबासाहेब इथापे, सुरेश लोखंडे, सतीश मखरे, हेमंत नलगे, सीमा गोरे उपस्थित होते. ऍड. अशोक रोडे यांनी सूत्रसंचालन केले. युवक कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष स्मितल वाबळे यांनी आभार मानले. 

दरम्यान, आज महाराष्ट्र प्रदेश काॅंग्रेसच्या कार्यकारिणी सदस्यपदी थोरात यांची निवड झाली आहे.

Edited By - Murlidhar karale

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख