पसंतीचा उमेदवार नसल्यास नोटाचे बटन दाबा ः हजारे  - If there is no preferred candidate, press the note button: Thousands | Politics Marathi News - Sarkarnama

पसंतीचा उमेदवार नसल्यास नोटाचे बटन दाबा ः हजारे 

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 15 जानेवारी 2021

मतदानाचा हक्क श्रेष्ठ हक्क आहे. सुदृढ व निकोप लोकशाहीसाठी राज्यातील प्रत्येक मतदाराने आपला मतदानाचा हक्क बजवावा.

राळेगणसिद्धी : मतदानाचा हक्क श्रेष्ठ हक्क आहे. सुदृढ व निकोप लोकशाहीसाठी राज्यातील प्रत्येक मतदाराने आपला मतदानाचा हक्क बजवावा, असे आवाहन ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी केले. 

राळेगणसिद्धी येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील मतदान केंद्रावर जाऊन हजारे यांनी आज सकाळी मतदान केले. या वेळी पत्रकारांशी बोलताना हजारे म्हणाले, की लोकांची, लोकांकडून व लोकांसाठी चालवलेली अशी आपली लोकशाही आहे. ग्रामपंचायत निवडणुकीत मतदारांचा मतदानाचा हक्क सर्वश्रेष्ठ आहे. मी माझा मतदानाचा हक्क बजावला, सर्व मतदारांनीही आपल्या मतदानाचा हक्क बजावणे, हे प्रत्येक मतदाराचे कर्तव्य आहे. पसंतीचा उमेदवार नसेल, तर नोटाचे बटन दाबा; परंतु प्रत्येकाने मतदानाचा आपला हक्क बजवावा. 

राळेगण सिद्धी ग्रामपंचायत निवडणूक केंद्रावर आज शांततेत मतदान सुरू झाले. सकाळी 11. 30 वाजेपर्यंत 30% मतदान झाले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सॅनिटायझरची सुविधा मतदान केंद्रावर उपलब्ध करून दिली आहे. सोशल डिस्टन्स पाळत व मास्क लावून मतदार मतदानाला येताना दिसत आहेत. तहसिलदार ज्योती देवरे यांनी त्यांच्या पथकासह राळेगणसिद्धी येथील मतदान केंद्राला भेट दिली. 

 

हेही वाचा..

नागवडे कारखान्याची उताऱ्यामध्ये आघाडी! 

नगर : जिल्ह्यातील सहकारी 13 व खासगी आठ साखर कारखान्यांचे गाळप सुरू आहे. सर्व कारखान्यांकडून 69 लाख 35 हजार 713 टन उसाचे गाळप झाले असून, त्यात अंबालिका कारखान्याने आघाडी घेतली आहे. साखर उताऱ्यात नागवडे कारखान्याची आघाडी कायम आहे. 

जिल्ह्यात सहकारी व खासगी असे एकूण 23 कारखाने आहेत. त्यांतील साईकृपा-दोन व तनपुरे सहकारी साखर कारखाना बंद आहे. जिल्ह्यातील सहकारी 13 कारखान्यांनी 45 लाख 76 हजार 903, तर खासगी आठ कारखान्यांनी 23 लाख 58 हजार 810 टन, असे एकूण 69 लाख 35 हजार 713 टन उसाचे गाळप केले आहे. आजअखेर एकूण 61 लाख 81 हजार 670 क्विंटल साखर तयार झाली आहे. त्यात अंबालिका कारखान्याने आठ लाख 28 हजार 335 टन गाळप केले आहे. सात लाख 81 हजार 200 क्‍विंटल साखर तयार करून जिल्ह्यात आघाडी कायम ठेवली आहे. 

अंबालिका कारखान्याने ऊसगाळपात आघाडी घेतली असली, तरी साखर उताऱ्यात नागवडे कारखाना आघाडीवर आहे. नागवडे कारखान्याचा साखर उतारा 10.36 आहे. 

Edited By - Murlidhar karale

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख