फडणवीस सरकारची ओळख पाण्यामुळेच घराघरात पोहोचली : मोदी - The identity of Fadnavis government reached households only because of water: Modi | Politics Marathi News - Sarkarnama

फडणवीस सरकारची ओळख पाण्यामुळेच घराघरात पोहोचली : मोदी

रविंद्र काकडे
मंगळवार, 13 ऑक्टोबर 2020

मोदी म्हणाले, फडणवीस सरकारने यांनी महाराष्ट्रात पाण्यासाठी मोठे काम केले.  केवळ सिंचनच नव्हे, तर लोकांना पिण्याचे शुद्ध पाणी दिले. त्यामुळे आगामी काळात महाराष्ट्राची भूमी प्रगतशील शेतकऱ्यांची होणार आहे.

लोणी : महाराष्ट्रात पाणी परिषदांच्या माध्यमातून त्यांनी एक जनआंदोलन उभे करण्याचा प्रयत्न केला. आज आम्ही आनंदात सांगू शकतो, की 2014 नंतर अशा विचारांना बळ दिले. देवेंद्र फडणवीस सरकारची ओळखच पाण्यामुळे घराघरात पोहचली आहे. महाराष्ट्रातील लहान-मोठ्या योजनाांवर काम सुरू केले गेले. आगामी दोन-तीन वर्षात हे काम पूर्ण झाल्यानंतर मोठा विकास दिसून येणार आहे, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा गाैरव केला.

दिवंगत माजी खासदार बाळासाहेब विखे पाटील यांच्या आत्मचरित्र असलेल्या `देह वेचावा कारणी` या पुस्तकाचे प्रकाशन आज पंतप्रधानांच्या हस्ते व्हर्च्युअल पद्धतीने झाले. या वेळी ते बोलत होते. कार्यक्रमास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व्हर्च्यूअल व्हिडिओ काॅन्फरन्सीने उपस्थित होते. लोणी येथे झालेल्या या कार्यक्रमास विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील तसेच मान्यवर उपस्थित होते. आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी प्रास्तविक केले.

मोदी म्हणाले, फडणवीस सरकारने यांनी महाराष्ट्रात पाण्यासाठी मोठे काम केले.  केवळ सिंचनच नव्हे, तर लोकांना पिण्याचे शुद्ध पाणी दिले. त्यामुळे आगामी काळात महाराष्ट्राची भूमी प्रगतशील शेतकऱ्यांची होणार आहे.

मोदी म्हणाले, की मुद्रा योजनेद्वारे प्रत्येक गावात स्वरोजगार वाढले. देशातील सेल्फ हेल्फ ग्रुपच्यामाध्यमातून 7 करोड महििलांना 3 करोड लाखांपेक्षा जास्त कर्ज दले. बॅंकांमध्ये नियम बदलले. सर्वांना किसान क्रेडिट कार्डची सुविधा दिली. एक अभियान बनवून ही सुविधा दिली. गावांमध्ये राहणाऱ्या लोकांमध्ये जेव्हा विश्वास वाढेल, त्यांचा आत्मविश्वास मजबूत होईल, तेव्हा आपला संक्लप मजबूत होईल. गावात आत्मनिर्भरचेचा हाच विश्वास बाळासाहेब विखे पाटील यांनी जागविला. हाच त्यांचा उद्देश होता. मला विश्वास आहे, की जो या आत्मकथनाला वाचेल, त्यांच्यामध्ये परिवर्तन राहिल्याशिवाय राहणार नाही.

कोरोनावर मात करूच

मोदी म्हणाले, की देशावर कोरोनाचे संकट आहे. परंतु घाबरू नका. चेहऱ्यावर मास्क, वारंवार हात धुणे, सामाजिक अंतर पाळा. जोपर्यंत औषध नाही, तोपर्यंत ढिलाई नाही. ही लढाई जिंकणारच आहे. 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख