प्रसंगी `तनपुरे'च्या संचालकपदाचा राजीनामा देईन ः खासदार विखे यांचा इशारा - I will resign from the post of director of 'Tanpure' on the occasion: MP Vikhe's warning | Politics Marathi News - Sarkarnama

प्रसंगी `तनपुरे'च्या संचालकपदाचा राजीनामा देईन ः खासदार विखे यांचा इशारा

विलास कुलकर्णी
शनिवार, 2 जानेवारी 2021

कारखाना वारंवार बंद पडण्यामागे नैसर्गिक दोष किंवा आपत्ती असती, तर मान्य केले असते; परंतु बॉयलरमध्ये साखर दिसून आली. त्यामुळे मन सुन्न झाले.

राहुरी : "तनपुरे साखर कारखान्याच्या बॉयलरमध्ये साखर जाणे मानवनिर्मित हलगर्जीपणा आहे. कोट्यावधी रुपये खर्च करून, कारखाना वारंवार बंद पडत आहे. नैसर्गिक दोष मान्य होता; परंतु कुणाला तरी कारखाना चालू नये असे वाटते. यापुढे 72 तासांचा अल्टीमेटम आहे. कारखाना सुरळीत सुरू झाला नाही, तर पत्रकार परिषद घेऊन, माझ्यासह संचालक मंडळ कारखान्याचा राजीनामा देईन, असा इशारा तनपुरे कारखान्याचे मार्गदर्शक खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी दिला. 

डॉ. बाबुराव बापुजी तनपुरे सहकारी साखर कारखान्याचे संचालक मंडळ व कामगारांसमोर आज खासदार डॉ. विखे पाटील बोलत होते. कारखान्याचे अध्यक्ष नामदेव ढोकणे, माजी अध्यक्ष उदयसिंह पाटील, उपाध्यक्ष दत्तात्रेय ढूस व संचालक उपस्थित होते. 

खासदार डॉ. विखे पाटील म्हणाले, की मागील चार वर्षांपासून कारखान्याच्या संचालक मंडळ व कामगारांनी कारखाना सुरळीत चालाव, यासाठी प्रामाणिक प्रयत्न केले. चालू गळीत हंगामात मागील दोन महिन्यांपासून शेतकऱ्यांच्या उसाचे गाळप वेळेत होण्यासाठी अहोरात्र परिश्रम घेतले जात आहेत; परंतु विविध समस्या, अडथळे येत आहेत. कारखाना सुरळीत चालण्यासाठी आठ-दहा कोटी रुपये खर्च केले. कारखाना वारंवार बंद पडण्यामागे नैसर्गिक दोष किंवा आपत्ती असती, तर मान्य केले असते; परंतु बॉयलरमध्ये साखर दिसून आली. त्यामुळे मन सुन्न झाले, असे विखे पाटील यानी सांगितले.

 

हेही वाचा...

कृषी विद्यापीठाच्या सुरक्षा माजी सैनिकांच्या हाती 

राहुरी विद्यापीठ : कुलसचिव मोहन वाघ यांच्या प्रयत्नानंतर कृषी विद्यापीठाच्या सुरक्षेसाठी महाराष्ट्र माजी सैनिक महामंडळाचे जवान तैनात करण्यात आले. सर्वांच्या समन्वयाने सुरक्षेचे चांगले काम करु, असे प्रतिपादन कुलसचिव मोहन वाघ यांनी सांगितले. 

विद्यापीठाच्या प्रक्षेत्र, मालमत्ता, कर्मचारी यांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देऊन, विद्यापीठाच्या मोठ्या प्रक्षेत्रावर अनुचीत प्रकार घडू नये, मालमत्तेचे, पिकांचे संरक्षण व्हावे, मोकाट जनावरांपासून प्रक्षेत्राचे संरक्षण व्हावे, या हेतूने कृषी विद्यापीठाची सुरक्षा व्यवस्था बळकटीकरणाचे काम सुरु होते. यासाठीच महाराष्ट्र माजी सैनिक महामंडळाचे (मेस्को) 15 माजी सैनिक कंत्राटी पध्दतीने घेण्यात आले आहे.

विद्यापीठातील कायम आस्थापनेवरील, कंत्राटी पध्दतीचे सुरक्षा रक्षक आणि मेस्कोचे जवान यांच्या समन्वयाने विद्यापीठाच्या सुरक्षेचे नविन वर्षापासून चांगले काम सुरू करणार आहेत. 

या वेळी विद्यापीठाचे नियंत्रक विजय कोते, सहयोगी संशोधन संचालक डॉ. बाबासाहेब माळी, प्रभारी सुरक्षा अधिकारी प्रा. सुनिल फुलसावंगे व नगर येथील माजी सैनिक महामंडळाचे जिल्हा पर्यवेक्षक सखाराम गवळी, नंदु राऊत उपस्थित होते. 
 

Edited By - Muridhar Karale

 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख