मी शिर्डीत पुन्हा येईन, पण परत जाणार नाही ः रामदास आठवले - I will come back to Shirdi, but I will not go back: Ramdas recalled | Politics Marathi News - Sarkarnama

मी शिर्डीत पुन्हा येईन, पण परत जाणार नाही ः रामदास आठवले

सतीश वैजापूरकर
सोमवार, 28 डिसेंबर 2020

शिवसेनेचे प्रवक्ते खासदार संजय राऊत यांच्या "आ देखे जरा, किसमे कितना है दम' या ट्‌वीटकडे त्यांचे लक्ष वेधले असता ते म्हणाले, " हम भी दिखाऐंगे हम नही है किसीसे कम...!

शिर्डी : दक्षिण नगर लोकसभा मतदारसंघातून भाजपचे डॉ. सुजय विखे पाटील खासदार झालेत. पण पुढच्या लोकसभा निवडणुकीत मी शिर्डीतून पून्हा येईन, पुन्हा येईन आणि लवकर परत जाणार नाही, अशा शब्दांत केंद्रीय समाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आपण येथून पुन्हा लोकसभा निवडणूक लढवू शकतो, असे संकेत दिले. 

शिर्डीत पत्रकारांशी बोलताना आठवले म्हणाले,  " त्यावेळी माजी खासदार (कै.) बाळासाहेब विखे पाटील यांच्यासाठी राष्ट्रवादी काॅंग्रेसने नगर दक्षिणची लोकसभेची जागा सोडली असती, तर उत्तरेत माझा पराभव झाला नसता. चार ते पाच लाखाच्या मताधिक्‍याने विजयी झालो असतो. त्यांच्यासाठी जागा सोडली नाही आणि अॅक्‍ट्रॉसिटीच्या मुद्यावर अपप्रचार झाल्याने माझा पराभव झाला. आता परिस्थिती बदलली आहे. तिकडे भाजपचे डॉ. विखे पाटील खासदार झाले. त्यामुळे मला इकडे यायला काही अडचण राहीली नाही.`` 

इंदू मिलच्या जागेवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लवकरात लवकर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक उभारावे. तुम्ही उभारणी करा. उद्‌घाटन आम्ही करू, अशी कोटी करीत शिवसेनेने दोन्ही काॅंग्रेससोबत सरकारात राहणे धोकादायक आहे. त्यांचे आमदार फुटू शकतात, असेही आठवले म्हणाले. 

शिवसेनेचे प्रवक्ते खासदार संजय राऊत यांच्या "आ देखे जरा, किसमे कितना है दम' या ट्‌वीटकडे त्यांचे लक्ष वेधले असता ते म्हणाले, " हम भी दिखाऐंगे हम नही है किसीसे कम...! 

आपणास ईडीबाबत काय वाटते, असे विचारले असता ते म्हणाले, की मी बिडी पित नाही, त्यामुळे मला ईडीची भिती वाटत नाही. पश्‍चिम बंगालमध्ये दलित मतांचे प्रमाण 36 टक्के आहे. त्यामुळे भाजपला विधानसभेच्या 200 जागा मिळतील, असा दावाही त्यांनी केला. 

या बैठकीपूर्वी भाजपचे नेते डॉ. राजेंद्र पिपाडा व शिर्डीचे नगराध्यक्ष शिवाजी गोंदकर यांनी त्यांचा सत्कार केला. या वेळी शिर्डीचे नगरसेवक सुजित गोंदकर, भाजपचे शहराध्यक्ष सचिन शिंदे, "गणेश'चे संचालक रामभाऊ कोते, ज्ञानेश्वर गोंदकर, दिलीप वाघमारे आदी उपस्थित होते. 

मी पुन्हा मंत्री होणार 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मला वाढदिवसाच्या शुभेच्या देण्यासाठी फोन आला. मी त्यांना म्हणालो, `तुम्ही पुढच्या निवडणुकीत पुन्हा पंतप्रधान होणार.` मनात म्हणालो, `म्हणजे मी देखील पून्हा मंत्री होईल.` 
 

Edited By - Murlidhar Karale

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख