मी जयंत पाटलांच्या कामात लुटबूड करीत नाही, राहुलला सांगा : अजित पवार  - I am not looting Jayant Patil's work, tell Rahul: Ajit Pawar | Politics Marathi News - Sarkarnama

मी जयंत पाटलांच्या कामात लुटबूड करीत नाही, राहुलला सांगा : अजित पवार 

संजय आ. काटे
रविवार, 31 मे 2020

सध्या सोशल मीडियावर एक आॅडिओ क्लिप व्हायरल होतेय. उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एका शेतकऱ्याचे हे संभाषण आहे. मी वरिष्ठांच्या कामात हस्तक्षेप घालत नाही. त्यामुळे तुम्ही राहुलला सांगा, असे पवार या शेतकऱ्याला सांगतात.

श्रीगोंदे : सध्या सोशल मीडियावर एक आॅडिओ क्लिप व्हायरल होतेय. उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एका शेतकऱ्याचे हे संभाषण आहे. मी वरिष्ठांच्या कामात हस्तक्षेप घालत नाही. त्यामुळे तुम्ही राहुलला सांगा, असे पवार या शेतकऱ्याला सांगतात. या क्लिपची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे.

``अजित पवार बोलतोय..``,

`` हा दादा, मारुती भापकर बोलतोय, नमस्काकर, मी पिंपळगाव पिसे (श्रीगोंदे) येथून बोलतोय. कुकडीचे पाणी सोडायला सांगा ना.. पिके जळायला लागली...``

``थांबा थांबा, मी त्या खात्याचा मंत्री नाही. जयंत पाटील यांना सांगा. त्यांनी कुकडीची बैठक घेतली आहे. मी कुठल्याही वरिष्ठ मंत्र्यांच्या कामाता लुडबूड करीत नाही. तुम्ही राहूल जगताप यांना सांगा, ते बोलतील जयंतरावांशी.. तुम्हाला माझा स्वभाव माहिती आहे ना...``

``पाण्यामुळं पिकं जळायला लागतील, साहेब. तुम्ही उपमुख्यमंत्री आहेत. तेवढं बघा दादा..``

 

ही फोनवरची चर्चा आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार व श्रीगोंद्यातील शेतकरी मारुती भापकर यांच्यामधील. ही क्लिप सध्या सोशल मिडीयावर चांगलीच व्हायरल होत आहे. तालुक्यातील पिंपळगावपिसे (खरातवाडी) येथील भापकर हे शेतकरी आहेत. त्यांनी कुकडीच्या पाण्यासाठी थेट अतित पवार यांनाच फोन केला. फोनच्या सुरवातीलाच भापकर यांनी ते माजी आमदार राहुल जगताप यांच्या गावाशेजारच्या गावातून बोलत आहेत. कुकडीचे पाणी अजून पंधरा दिवस येणार नाही, हे सोडायला सांगा ना. पिके जळायला लागली असल्याची खंत मांडू लागले.

त्याचवेळी पवार यांनी त्यांना थांबवित सांगितले की, मी त्या खात्याचा मंत्री नाही. जंयंतराव झाले. छगन भुजबळ झाले. हे पदांनी माझ्यापेक्षा सिनीअर मंत्री आहेत. राजेश, दत्ता यांना सांगू शकतो. पण पदाने वरिष्ठ असणाऱ्या मंत्र्यांच्या कामात मी हस्तक्षेप करीत नाही. तुम्हाला माझा स्वभाव माहिती आहे ना. होणार असले तरच हो म्हणणार. तुम्ही राहुल जगताप यांना सांगा. ते बोलतील जंयतरावांशी. आपणही बोलून घ्या, असे हे संभाषण सध्या जोरात व्हायरल होत आहे.

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख