राष्ट्रवादीत जाणार ही अफवा, मी भाजपमध्येच खूष : वैभव पिचड - I am happy in BJP only, this rumor will go to NCP: Vaibhav Pichad | Politics Marathi News - Sarkarnama

राष्ट्रवादीत जाणार ही अफवा, मी भाजपमध्येच खूष : वैभव पिचड

शांताराम काळे
रविवार, 20 डिसेंबर 2020

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व राज्याचे नेते देवेंद्र फडणवीस यांची देश व राज्य हितासाठी चाललेली धडपड विकासाचे व्हिजन, यामुळे मी त्यांच्या नेतृत्वावर खूष आहे .

अकोले : मी राष्ट्रवादीत जाणार, ही केवळ अफवा असून, मी यापूर्वी सांगितले आहेच, परंतु आजही सांगतो, आपण भाजपमध्ये खूष असून, इतर पक्षात जाण्याचा प्रश्नच नाही, असे भाजपचे माजी आमदार वैभव पिचड यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

पिचड म्हणाले, की देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व राज्याचे नेते देवेंद्र फडणवीस यांची देश व राज्य हितासाठी चाललेली धडपड विकासाचे व्हिजन, यामुळे मी त्यांच्या नेतृत्वावर खूष आहे . गाव तिथे भाजप शाखा, बूथ ही कामे माझे तरुण कार्यकर्ते करत आहेत. तर नुकताच गोवारी प्रश्नात केंद्र सरकारने लक्ष घालून आदिवासी समाजाला न्याय हकक मिळवून दिला आहे.  कोरोना संकटात मोफत धान्य, शेतकऱ्याच्या खात्यावर निधी, महिलांना मोफत गॅस, या योजना केंद्र सरकार व भाजप सरकारने दिल्या आहेत .गरीबांना अडचणीच्या काळात मदत करणारा भाजप हा एकमेव पक्ष आहे. हे सर्व मी इतर पक्षात कशासाठी जाईल. मी भाजपमध्येच राहणार आहे. त्यामुळे अशा अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन पिचड यांनी केले.

दरम्यान, पिचड राष्ट्रवादीच्या वाटेवर असल्याचे राजकीय वर्तुळातून बोलले जात होते. नुकत्याच झालेल्या काही महाराष्ट्रातील महत्त्वाच्या निर्णयाबाबत पिचड यांनी सरकारचे अभिनंदनही केले होते. त्यामुळे पिचड राष्ट्रवादीत जातील, अशी शक्यता राजकीय गोटातून व्यक्त होत होती, तथापि, आपण चांगल्या कामाचे काैतुक करीत असून, कामात काही गडबड असल्यास तेथे आवज उठवितो. जनतेच्या प्रश्नांसाठी मी कायम तत्पर असतो. आगामी होणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुकीत जास्तीत जास्त ग्रामपंचायती भाजपनेत्यांच्या मार्गदर्शनाखाली लढणार आहेत. तसेच बहुतेक ग्रामपंचायतींचे सरपंच हे भाजपचे असतील. त्यामुळे ऐन निवडणुकीच्या काळात अशा पद्धतीच्या अफवांवर विश्वास ठेऊ नये, असे आमदार पिचड यांनी स्पष्ट केले.

 

Edited By - Murlidhar Karale

 

 

 

 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख